फ्लॉप विराटला संधी पण फॉर्मात असलेल्या या युवा खेळाडूला डावललं, पाहा कोण हा खेळाडू

फ्लॉप ठरलेल्या विराट कोहलीला टीम इंडियामध्ये सतत खेळण्याची संधी दिली जात आहे. यामुळे काही युवा खेळाडूंचं करिअर यामुळे धोक्यात आलं आहे. युवा खेळाडूंकडे कॅप्टन रोहित शर्मा आणि निवड समिती दुर्लक्ष करत आहे

Updated: Aug 10, 2022, 12:57 PM IST
फ्लॉप विराटला संधी पण फॉर्मात असलेल्या या युवा खेळाडूला डावललं, पाहा कोण हा खेळाडू title=

मुंबई: फ्लॉप ठरलेल्या विराट कोहलीला टीम इंडियामध्ये सतत खेळण्याची संधी दिली जात आहे. यामुळे काही युवा खेळाडूंचं करिअर यामुळे धोक्यात आलं आहे. युवा खेळाडूंकडे कॅप्टन रोहित शर्मा आणि निवड समिती दुर्लक्ष करत आहे. निवड समितीने पुन्हा एकदा युवा खेळाडूवर अन्याय केला आहे. 22 वर्षांच्या युवा खेळाडूला आशिया कपमध्ये खेळण्याची संधी दिली नाही. हा खेळाडू टीममध्ये हिट ठरला होता. या खेळाडूला हिटमॅनची कॉपी देखील म्हटलं जातं.

विराट कोहली गेल्या दीड वर्षात अत्यंत वाईट फॉर्ममध्ये खेळत आहे. रहाणेनंतर कोहलीचा नंबर टीममधून आऊट होण्यासाठी लागणार का? अशी एकीकडे चाहत्यांना धास्ती आहे. तसं असतानाही निवड समिती मात्र कोहलीला सतत खेळण्याची संधी देत आहे. तर युवा फलंदाजांकडे मात्र सतत दुर्लक्ष करत आहे. युवा फलंदाजांना बाहेर बसवून टीमचं नुकसान होत असल्याची टीक दिग्गज क्रिकेटर करत आहेत. अशा परिस्थितीमध्ये हिटमॅनची कॉपी असलेल्या 22 वर्षीय युवा खेळाडूचं करिअर धोक्यात आलं आहे.

वेस्ट इंडिज दौरा असो किंवा झिम्बावे त्या पाठोपाठ आता आशिया कपमध्ये देखील अनेक युवा बॉलर्सना संधी देण्यात आली. मात्र पृथ्वी शॉकडे दुर्लक्ष करण्यात आलं. त्याला टीममधून बाहेर बसवण्यात आलं आहे. गेल्या काही सीरिजमध्ये तो टीममधून खेळताना दिसला नाही. एकीकडे श्रेयस अय्यर, दीपक हुड्डाला खेळवलं जात आहे. मात्र युवा खेळाडू पृथ्वी शॉकडे दुर्लक्ष केलं जात आहे. त्याचा टी नटराजन होऊ नये म्हणजे झालं असं चाहत्यांना वाटत आहे.

पृथ्वी शॉ एक धडाकेबाज फलंदाज आहे. त्याची बॅट चालली तर टीम इंडियासाठी तो गेमचेंजर ठरू शकतो. टीम इंडियाला सध्या एका चांगल्या ओपनरची गरज आहे. ही जबाबदारी पृथ्वी शॉकडे द्यायला हरकत नाही.कारण तो एक उत्तम फलंदाज आहे. त्याने अंडर 19 मध्ये देखील उत्तम कामगिरी केली होती. टीम इंडियाकडून तिन्ही फॉरमॅटसाठी खेळला आहे. मात्र निवड समिती त्याला खेळण्याची संधी देताना दिसत नाहीत.

पृथ्वीने भारताकडून 5 कसोटी सामने खेळले आहेत. त्यामध्ये 339 धावा केल्या तर 6 वन डे सामने खेळले असून त्यामध्ये 189 धावा केल्या आहेत. याशिवाय 63 आयपीएलचे सामने खेळले आहेत ज्यामध्ये 1588 धावा केल्या आहेत. पृथ्वीच्या नावावर एक शतक आहे.  

आशिया कपसाठी भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उप कर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुड्डा, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, रविंद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, युजवेंद्र चहल, रवि बिश्नोई, भुवनेश्वर कुमार अर्शदीप सिंह, आवेश खान.