कर्णधार Rohit Sharma कोरोना पॉझिटीव्ह; टीम इंडियाला मोठा धक्का

बीसीसीआयने ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिलीये.

Updated: Jun 26, 2022, 06:39 AM IST
कर्णधार Rohit Sharma कोरोना पॉझिटीव्ह; टीम इंडियाला मोठा धक्का title=

मुंबई : भारत आणि इंग्लंड यांच्यातील एकमेव कसोटी 1 जुलैपासून सुरू होणार आहे. या मोठ्या सामन्यापूर्वी टीम इंडियाच्या अडचणी काही संपायचं नाव घेत नाहीयेत. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. रोहित शर्मा शनिवारी रॅपिड अँटीजेन चाचणीत कोरोना पॉझिटिव्ह आढळला. बीसीसीआयने ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिलीये.

सराव सामन्यातून बाहेर

लीसेस्टरशायर विरुद्ध खेळल्या जात असलेल्या 4 दिवसीय सराव सामन्यात रोहित टीमचा भाग होता. पहिल्या डावातही त्याने फलंदाजी केली, मात्र दुसऱ्या डावात तो फलंदाजीला आला नाही. दुसऱ्या डावात रोहितने युवा फलंदाज केएस भरतला ओपनिंगसाठी पाठवलं दिली. 

बीसीसीआयने सांगितलं की, रोहित शर्मा सध्या हॉटेलमध्ये आयसोलेशनमध्ये आहे. शिवाय त्याला वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलं आहे.

अश्विन आणि विराटही कोरोना पॉझिटिव्ह

टीम इंडिया 16 जूनला इंग्लंडला रवाना झाली होती, मात्र टीम इंडियाचा स्टार ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर टीमसोबत गेला नाही. 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, गेल्या आठवड्यात लंडनला पोहोचलेल्या विराट कोहलीलाही कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं. मात्र सध्या हे दोन्ही खेळाडू सध्या ठीक असून टीमसोबत आहेत.