आम्ही मजेशीर बनवण्याचा प्रयत्न...; तिसऱ्या टेस्टमधील पराभवानंतर Rohit Sharma चं वादग्रस्त विधान

रोहितच्या म्हणण्याप्रमाणे, टेस्ट सामन्याला अधिक रंजक बनवण्यासाठी आम्ही असं करतोय. दरम्यान त्याच्या या विधानानंतर चाहत्यांनी त्याच्यावर टीका करायला सुरुवात केली आहे. 

Updated: Mar 3, 2023, 04:09 PM IST
आम्ही मजेशीर बनवण्याचा प्रयत्न...; तिसऱ्या टेस्टमधील पराभवानंतर Rohit Sharma चं वादग्रस्त विधान title=

Rohit Sharma : भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यामध्ये बॉर्डर गावस्कर सिरीज (Border–Gavaskar Trophy) खेळण्यात येतेय. इंदूरध्ये या सिरीजचा तिसरा सामना खेळवण्यात आला असून सामन्याच्या तिसऱ्या दिवशी कांगारूंनी टीम इंडियाचा (Team India) पराभव केला. पहिल्या 2 टेस्टप्रमाणे या टेस्टचा निकाल देखील तिसऱ्या दिवशी लागला. यावेळी आता इंदूरच्या पीचवरून देखील प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. अशामध्येच कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) याबाबत विचित्र विधान केलं आहे. रोहितच्या या विधानाने एकच खळबळ माजली आहे. 

रोहितच्या म्हणण्याप्रमाणे, टेस्ट सामन्याला अधिक रंजक बनवण्यासाठी आम्ही असं करतोय. दरम्यान त्याच्या या विधानानंतर चाहत्यांनी त्याच्यावर टीका करायला सुरुवात केली आहे. 

तिसऱ्या टेस्ट सामन्यामध्ये टीम इंडियाचा पराभव

इंदूरच्या तिसऱ्या टेस्ट सामन्यामध्ये टीम इंडियाचा 9 विकेट्सने पराभव झाला. यावेळी सामना संपल्यानंतर रोहित शर्मा म्हणाला की, केवळ भारत नाही तर भारताच्या बाहेर देखील 5 दिवसांपर्यंत टेस्ट सामने होत नाहीयेत. दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये सुरु असेलला सामना देखील तिसऱ्या दिवशी संपला. पाकिस्तानात तर लोकं टेस्ट सामन्याला बोरिंग म्हणतात. त्यामुळे आम्ही याला मजेशीर करतोय. 

पिचवर खेळण्याचा निर्णय सामूहिक

इंदूरच्या पिचबाबत बोलताना रोहित म्हणाला, या अशा पद्धतीच्या पीचवर खेळणं हा आमचा सामूहिक निर्णय होता. आम्हाला याची कल्पना होती की, या पीचवर खेळणं फलंदाजांसाठी कठीण असणार आहे. त्यामुळे आम्ही त्या आव्हानासाठी तयार होतो. 

कांगारूंचा विजय

तिसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा 9 विकेट्सने पराभव केला आहे. (IND vs AUS 3rd Test) या कसोटी विजयासह ऑस्ट्रेलिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलसाठी पात्र ठरला आहे. (Test Cricket News) दरम्यान, चार सामन्यांच्या बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेत टीम इंडियाने 2 -1 अशी आघाडी कायम ठेवली आहे. या विजयामुळे चौथ्या कसोटीत चुसर निर्माण होण्याची शक्यता आहे. आता कांगारुंसाठीही ही कसोटी मालिका 2 -2 अशी बरोबरी करण्याची संधी आहे. तर टीम इंडिया चौथा सामना जिंकून मालिका जिंकण्याचा प्रयत्न करणार आहे. 

इंदूरमध्ये खेळल्या गेलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी अवघ्या 76 धावांचे टार्गेट ठेवण्यात आले होते. ऑस्ट्रेलियाने केवळ एक गडी गमावून सहज गाठले. इंदूरमध्ये ऑस्ट्रेलियाला पराभूत करण्यासाठी टीम इंडिया अपयशी ठरली आहे. रोहित टीमचे सर्व 'प्लानिंग' फोल ठरले चौथा आणि शेवटचा कसोटी सामना 9 मार्चपासून अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.