Rohit Sharma : टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माचा ( Rohit Sharna ) मजा-मस्करीचा स्वभाव त्याच्या प्रत्येक चाहत्याला माहितीये. मैदानात असो किंवा मैदानाबाहेर रोहित शर्मा ( Rohit Sharna ) हा अनेकदा मस्करीच्या मूडीमध्ये दिसून येतो. टीम इंडियाचा स्टार खेळाडू ईशान किशानचा ( Ishan Kishan ) नुकताच वाढदिवस झाला. यावेळी ईशनला वाढदिवसाचं गिफ्ट देण्याऐवजी रोहितनेच त्याच्याकडे खास गिफ्ट मागवलंय.
सोशल मीडियावर रोहित शर्मा ( Rohit Sharna ) आणि ईशान किशन यांचा एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसतोय. ज्यामध्ये रोहित शर्मा ईशान किशनची मस्करी करताना दिसतोय. यावेळी तो ईशानकडे खास गिफ्ट मागतोय.
रोहित आणि ईशान ( Rohit Sharna ) यांच्यामधील नातं सर्वांना माहितीये. हे दोघंही आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळतात. त्यामुळे या दोघांमध्येही चांगलं बॉन्डींग आहे. सामना सुरु असताना असो किंवा मैदानाबाहेर असो रोहित ईशानची नेहमी मस्करी करताना दिसतो.
सध्या टीम इंडिया वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर आहे. यावेळी 18 जुलैला ईशान किशनने ( Rohit Sharna ) प्रॅक्टिस सेशन दरम्यान 25 वा वाढदिवस साजरा केला आहे. बीसीसीआय ( BCCI ) म्हणजे भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाने एक व्हिडीओ शेअर केलाय. ज्यामध्ये ईशानच्या वाढदिवसाच्या दिवशी रोहित ( Rohit Sharna ) ईशानकडूनच गिफ्ट मागताना दिसतोय.
शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये रोहितला विचारण्यात आलं की तो ईशान किशनला काय गिफ्ट देणार आहे? या प्रश्नाला उत्तर देताना पहिल्यांदा रोहित म्हणाला की, त्याला विचारलं पाहिजे त्याला काय हवयं. त्यानंतर संपूर्ण टीम मिळून त्याला गिफ्ट देणार आहे.
मात्र यापुढे बोलताना रोहित शर्मा म्हणाला की, अरे पण तुला काय हवंय? सगळं तर आहे तुझ्याकडे....तुच आम्हाला गिफ्ट दे...सामन्यात सेंच्युरी मारून तुच आम्हाला वाढदिवसाचं खास गिफ्ट दे.
Rohit Sharma's playful remark on Ishan Kishan
What did Rohit Sharma say on Ishan Kishan's Birthday in the press conference ahead of the 2nd #WIvsIND test?
Watch to know @Wowmomo4u @debasissen @ImRo45 @ishankishan51 #IshanKishan pic.twitter.com/arOEkKwk8C
— RevSportz (@RevSportz) July 18, 2023
रोहितने मागितलेलं हे गिफ्ट ऐकून ईशान किशन देखील हसू लागला. या दोघांचाही हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसतोय.
ईशान किशनने नुकतंच वेस्ट इंडिजविरूद्ध डेब्यू केलं होतं. रोहित शर्माने डोमिनिकामध्ये खेळवल्या गेलेल्या टेस्ट सामन्यात प्लेईंग 11 मध्ये ईशानचा समावेश केला होता. मात्र डेब्यूच्या सामन्यात ईशानला केवळ 1 रन करता आला.