IPL 2022 : रोहित शर्मा मानसिक...; माजी खेळाडूचं मोठं वक्तव्य

मुंबई इंडियन्ससाठी यंदाच्या सिझनची सुरुवात काही खास झालेली नाही.

Updated: Apr 14, 2022, 12:29 PM IST
IPL 2022 : रोहित शर्मा मानसिक...; माजी खेळाडूचं मोठं वक्तव्य title=

पुणे : मुंबई इंडियन्ससाठी यंदाच्या सिझनची सुरुवात काही खास झालेली नाही. पाचव्या पराभवानंतर सोशल मीडियावर रोहित शर्माला प्रचंड ट्रोल करण्यात आलं आहे. तर रोहित शर्मासंदर्भात दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार ग्रॅम स्मिथ याने मोठं वक्तव्य केलं आहे.

स्मिथच्या म्हणण्यानुसार, सर्व फॉरमॅटमध्ये भारताच्या कर्णधारपदाचा मानसिक ताण रोहित शर्माला आयपीएल 2022 मध्ये प्रभावित करू शकतो. 

एका इंटरव्ह्यू दरम्यान ग्रॅम स्मिथ म्हणाला की, रोहित हा टॉप ऑर्डरमधील महत्त्वाचा फलंदाज आहे. तो चांगली सुरुवात करतो. त्यामुळे खालील फळीतील फलंदाजांना रन्स करणं सोपं जातं. 

"टीम इंडियाचा तिन्ही फॉर्मेटमध्ये कर्णधार बनल्यानंतर मुंबई इंडियन्सचं नेतृत्व करत असलेली ही पहिलीच स्पर्धा आहे. त्यामुळे तो आयपीएलमध्ये तो मानसिक तणावातून जात आहे का? हे विचारात घेण्यासारखे असल्याचं, स्मिथने म्हटलंय

रोहितला आयपीएल 2022 मध्ये ओपनर म्हणून चांगली कामगिरी करता आली नाही. कर्णधारपदाच्या बाबतीत मुंबई इंडियन्सला 5 सामन्यांत पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. 

शेवटच्या ओव्हरपर्यंत गेलेल्या रंगतदार सामन्यात पंजाब किंग्सने मुंबई इंडियन्सवर 12 धावांनी विजय मिळवला.  पंजाबने मुंबईला विजयासाठी 199 रन्सचं आव्हान दिलं होतं. मात्र मुंबईला 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 186 रन्सचं करता आले. पंजाबच्या या विजयासह मुंबईचा हा या मोसमातील सलग पाचवा पराभव ठरला.