Rohit Sharma To Miss 1st ODI: भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यामध्ये बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी (Border Gavaskar trophy) नुकतीच संपली. या सिरीजमध्ये टीम इंडियाने बाजी मारली. 2-1 ने टीम इंडियाने हा सिरीज जिंकली. या सामन्यानंतर टीम इंडियाला (Team India) कांगारूंविरूद्ध आता वनडे सिरीज खेळायची आहे. मात्र याचपूर्वी टीम इंडियाला (Team India) मोठा धक्का बसला आहे. कारण ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या पहिल्या सामन्यामध्ये टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) बाहेर गेलाय.
मुख्य म्हणजे, यावेळी रोहित शर्माला कोणतीही दुखापत नाहीये किंवा कोणत्याही फिटनेसची समस्या नाहीये. तरीही पहिल्या टेस्टमधून रोहित शर्मा (Rohit Sharma) बाहेर पडला आहे.
पहिल्या वनडे सामन्यात रोहित शर्माच्या अनुपस्थितीत टीम इंडियाच्या कर्णधारपदाची धुरा हार्दिक पंड्याकडे (Hardik Pandya) सोपवण्यात आली आहे. दरम्यान ज्यावेळी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली होती, त्याचवेळी रोहित शर्मा वैयक्तिक कारणांमुळे बाहेर पडला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, रोहित शर्माची पत्नी रितीका सजदेहच्या भावाचं 17 मार्च रोजी लग्न आहे. याच कारणाने पहिल्या वनडे सामन्यातून रोहित शर्माने (Rohit Sharma) माघार घेण्याचा निर्णय घेतला.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये 3 सामन्यांची वनडे सिरीज (ODI Series) खेळवली जाणार आहे. यामध्ये ऑस्ट्रेलियाच्या टीमची धुरा स्टिव्ह स्मिथकडे देण्यात आली आहे. 17 मार्चपासून वनडे सिरीजला सुरुवात होणार आहे. ऑस्ट्रेलियाविरूद्ध (Austalia team) ही 3 सामन्यांची वनडे सिरीज असणार आहे.
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, के एल राहुल, ईशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, वाशिंगटन सुंदर, युझवेंद्र चहल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, शार्दुल ठाकुर, अक्षर पटेल, जयदेव उनादकट
भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND VS AUS) यांच्यामध्ये बॉर्डर गावस्कर ट्रॉफी खेळवण्यात आली होती. यामध्ये पहिल्या 2 सामन्यांमध्ये टीम इंडियाने विजय मिळवला. तर तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचं वर्चस्व दिसून आलं. तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा विजय झाल्याने सिरीजची स्थिती 2-1 अशी होती. अशातच चौथा सामना ड्रॉ झाल्याने टीम इंडियाने टेस्ट सिरीज जिंकली.