पुणे : यंदाची आयपीएल मुंबई इंडियन्सच्या टीमसाठी खरंच एक जणू वाईट स्वप्न आहे. या सिझनमध्ये मुंबईला 5 सामन्यांमध्ये एकदाही विजयाची नोंद करता आली नाहीये. तब्बल 5 वेळा आयपीएलचा खिताब जिंकणाऱ्या मुंबईला या सिझनमध्ये सलग 5 पराभवांचा सामना करावा लागला आहे. तर पाचव्या पराभवानंतर कर्णधार रोहित शर्माने मोठं वक्तव्य केलं आहे.
पंजाब किंग्ज विरूद्धच्या सामन्यात हातातोंडाशी आलेला सामना मुंबईने गमावला. पंजाबने मुंबईचा 12 रन्सने पराभव केला. यानंतर रोहितने पंजाबकडून जिंकण्याचं श्रेय हिरावणार नसल्याचं म्हटलंय.
सामना संपल्यानंतर रोहित शर्मा म्हणाला, नेमकी कुठे चूक झाली हे कळलं नाही. आमची कुठे चुकलो हे शोधण्यासारखं मला नाही वाटत काही आहे. आम्ही चांगलं खेळलो आणि विजयाच्या अगदी जवळ आलो. काही रन्स आऊटमुळे आमच्या टीमला धक्का बसाला. पण आम्ही हार मानली नाही.
रोहित पुढे म्हणाला, सेकंड हाफमध्ये चांगली गोलंदाजी करण्याचं श्रेय पंजाबला जातं. आम्ही वेगळ्या कल्पनेसह खेळण्याचा प्रयत्न करतोय, परंतु काहीच चांगलं होतं नाहीये. आम्ही चांगलं क्रिकेट खेळत नसून, आम्हाला परिस्थिती समजून घेऊन त्यानुसार वागलं पाहिजे.
शेवटच्या ओव्हरपर्यंत गेलेल्या रंगतदार सामन्यात पंजाब किंग्सने मुंबई इंडियन्सवर 12 धावांनी विजय मिळवला. पंजाबने मुंबईला विजयासाठी 199 रन्सचं आव्हान दिलं होतं. मात्र मुंबईला 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 186 रन्सचं करता आले. पंजाबच्या या विजयासह मुंबईचा हा या मोसमातील सलग पाचवा पराभव ठरला.