नवी दिल्ली : एकदिवसीय सामन्यात द्विशतक ठोकण्याचा विक्रम करणारा भारताचा युवा फलंदाज रोहित शर्माने असा दावा केला आहे ज्यामुळे अनेक बॉलर्सची झोप उडाली आहे.
रोहित शर्माने एका मुलाखतीत म्हटलं की, "मी आता कोठे ही सामना खेळतो तेव्हा लोकांची अपेक्षा असते की मी ४०० रन करावे. लोकं मला विचारतात की ३०० रन केव्हा करणार. हे बोलणे सोपे वाटते पण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ते कठीण आहे. भारतीय प्रेक्षकांचं प्रेम आणि अपेक्षा माझ्या आणि संघासोबत नेहमीच असतात आणि मी ही आशा पूर्ण करण्याचा प्रयत्न करीन आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये 300 धावा करेल.'
रोहितने आपल्या एकदिवसीय कारकिर्दीत दुहेरी शतके झळकावलं आहे. तो म्हणाला की, पहिलं द्विशतक संघाच्या दृष्टीकोनातून खूप महत्वाचं होतं. हा भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेचा 2013 मधील अंतिम सामना होता. हे द्विशत माझासाठी महत्त्वपूर्ण होता कारण मी संघाच्या विजयासाठी योगदान दिले होते. ज्यामुळे भारताने मालिका जिंकली होती. श्रीलंकाविरुद्धचं दुसरं दुहेरी शतक देखील महत्त्वपूर्ण होतं. कारण मी त्या डावात ३३ चौकार ठोकले होते जे आश्चर्यकारक होते.
रोहित शर्मा हा जगातील एकमेव फलंदाज आहे, ज्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये दोन द्विशतके ठोकली आहेत. २०१३ मध्ये त्याने ऑस्ट्रेलियात पहिले द्विशतक झळकावले. रोहितने १५८ चेंडूत २० चौकार आणि १६ षटकारांसह 208 धावा केल्या होत्या. २०१४ मध्ये श्रीलंकेविरुद्ध त्याने दुसरे शतक झळकावले. त्यामध्ये त्याने १७३ चेंडूत ३३ चौकार आणि ९ षटकारांसह २६४ धावा केल्या. त्याचा आजपर्यंतचा हा विक्रम मोडला गेलेला नाही.