T20 World Cup: आयपीएलचे आता केवळ शेवटचे 2 सामने बाकी आहे. यावेळी जून महिन्याच्या सुरुवातीपासूनच आयसीसी क्रिकेट टी-20 वर्ल्डकपला सुरुवात आहे. 2 जूनला वर्ल्डकपचा पहिला सामना खेळवण्यात येणार असून 5 जून रोजी टीम इंडियाला या टूर्नामेंटमधील पहिला सामना खेळायचा आहे. वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत वर्ल्डकपचं आयोजन करण्यात आलं आहे. या वर्ल्डकपसाठी टीम इंडियाचे काही खेळाडू 25 मे रोजी अमेरिकेला रवाना होणार आहे. याशिवाय काही खेळाडू थोड्या काळाने न्यूयॉर्कला पोहोचणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कर्णधार रोहित शर्मासह 7 खेळाडू 25 मे रोजी अमेरिकेला रवाना होणार आहे. बीसीसीआयच्या एका सूत्राने सांगितलं की, 'रोहित शर्मा, हार्दिक पंड्या, सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह, ऋषभ पंत, अर्शदीप सिंग, अक्षर पटेल आणि सपोर्ट स्टाफ 25 मे रोजी रवाना होणार आहे. अमेरिकेला जाणारा टीम इंडियाचा हा पहिला ग्रुप असणार आहे. हा ग्रुप 21 मे रोजी रवाना होणार होता, परंतु भारतीय संघ बांगलादेशविरुद्ध 1 जून रोजी एकमेव सराव सामना खेळणार आहे. त्यामुळे खेळाडूंना घरच्या मैदानावर काही अतिरिक्त वेळ मिळू शकला.
आयपीएल फायनल खेळणारे खेळाडू 27 मे रोजी रवाना होणार आहे. त्यामुळे वर्ल्डकपच्या टीममध्ये समाविष्ट भारतीय खेळाडूंना आयपीएल ट्रॉफी जिंकल्याचा आनंद साजरा करण्याची संधीही मिळणार नाही. यामुळे टीमला जेट लॅग कमी करण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल. टीम इंडियाला पहिला सामना 5 जून रोजी आयर्लंड आणि ९ जून रोजी पाकिस्तानविरुद्ध खेळायचा आहे.
रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, संजू सॅमसन, शिवम दुबे, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंह, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज