Rohit Sharma : कर्णधार रोहितचा व्हिडीओ पाहून तुम्हालाही वाटेल अभिमान; स्टेडियममध्ये तिरंगा हाती असणाऱ्या चाहत्याला त्यानं...

Rohit Sharma : टीम इंडियाचा ( Team India ) कर्णधार रोहित शर्माचा ( Rohit sharma ) एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसतोय. भारतीय कर्णधार स्टेडियममध्ये उपस्थित चाहत्यांचा उत्साह वाढवण्याचा प्रयत्न करत होता. 

सुरभि जगदीश | Updated: Sep 14, 2023, 01:13 PM IST
Rohit Sharma : कर्णधार रोहितचा व्हिडीओ पाहून तुम्हालाही वाटेल अभिमान; स्टेडियममध्ये तिरंगा हाती असणाऱ्या चाहत्याला त्यानं... title=

Rohit Sharma : टीम इंडियाने ( Team India ) एशिया कपच्या फायनल सामन्यात धडक मारली आहे. श्रीलंकेसोबत झालेल्या सामन्यात टीम इंडियाने ( Team India ) 41 रन्सने पराभव करत फायनलचं तिकीट मिळवलं. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने 214 रन्सचं लक्ष्य दिलं होतं. यावेळी श्रीलंकेची टीम आव्हानाचा पाठलाग करताना अवघ्या 172 रन्सवर ऑलआऊट झाली. दरम्यान या सामन्यानंतर टीम इंडियाचा ( Team India ) कर्णधार रोहित शर्माचा ( Rohit sharma ) एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसतोय. 

या सामन्यानंतर एक खास क्षण कॅमेऱ्यात कैद झाला, जो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये भारतीय कर्णधार रोहित शर्मा ( Rohit sharma ) स्टेडियममध्ये असलेल्या एका भारतीय चाहत्याला भारताचा तिरंगा हवेत जोमाने फडकावण्यासाठी प्रोत्साहित करताना दिसतोय. भारतीय कर्णधार स्टेडियममध्ये उपस्थित चाहत्यांचा उत्साह वाढवण्याचा प्रयत्न करत होता. 

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहीलंय की, रोहित शर्माने ( Rohit sharma ) भारताचा झेंडा फडकवण्यासाठी सांगितलं. किती चांगला व्यक्ती आहे.

रोहित शर्माची रेकॉर्ड तोड खेळी

श्रीलंकेविरूद्धच्या सामन्यात रोहित शर्माने ( Rohit sharma ) त्याच्या खेळीच्या जोरावर अनेक रेकॉर्ड केले आहेत. रोहित शर्माच्या या स्फोटक खेळीत 7 फोर आणि 2 सिक्सचा समावेश होता. यावेळी रोहितने पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदीचा विक्रम मोडीत काढला आहे. रोहित शर्मा आता एशिया कपच्या इतिहासात सर्वाधिक सिक्स मारणारा फलंदाज बनलाय. 

यासोबतच रोहित वनडेमध्ये सर्वात जलद 10,000 रन्स करणारा दुसरा फलंदाज ठरलाय. त्याने ओपनर म्हणून 8000 रन्स पूर्ण केलेत. आशिया कपमध्ये स्पर्धेत सर्वाधिक अर्धशतकं झळकावणारा भारतीय फलंदाज ठरलाय.

टीम इंडियाला मिळालं फायनलचं तिकीट

टीम इंडियाने ( Team India ) एशिया कप 2023 च्या फायनलमध्ये आपली जागा पक्की केलीये. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने एशिया कपच्या सुपर-4 फेरीत श्रीलंकेचा 41 रन्सने पराभव केला. या सामन्यात टीम इंडियाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. त्यानुसार, 49.1 ओव्हर्समध्ये त्याने 213 रन्स केले. त्यानंतर श्रीलंकेची टीम 41.3 ओव्हर्समध्ये 172 रन्समध्ये ऑलआऊट झाली. या विजयासह टीम इंडिया 11व्यांदा एशिया कपच्या अंतिम फेरीत पोहोचलीये.