जोडी नंबर वन! RR साठी ठरणार विनिंग फॅक्टर

'ही' जोडी मिळवून देणार RR ला IPL ची ट्रॉफी, RCB ची आज पळताभुई थोडी

Updated: Apr 5, 2022, 03:34 PM IST
जोडी नंबर वन! RR साठी ठरणार विनिंग फॅक्टर title=

मुंबई : राजस्थान रॉयल्स टीमची सुरुवात यंदाच्या हंगामात जबरदस्त झाली आहे. या टीमची सध्या पॉईंटटेबलवरही दहशत आहे. दुसरीकडे RCB ला युजवेंद्र चहलला सोडून पश्चिताप करायची वेळ आली आहे. कारण राजस्थानमध्ये चहलचा जलवा सुरू आहे. 

बंगळुरू टीम 1 सामना जिंकला तर एक पराभूत झाली आहे. राजस्थान टीमने दोन्ही सामने जिंकले आहेत. आज राजस्थान विरुद्ध बंगळुरू सामना आहे. या सामन्यात कोण वरचढ ठरणार हे पाहावं लागणरा आहे. 

या सामन्यात अश्विन आणि चहल जोडी नंबर वन ठरणार आहे. आतापर्यंत झालेल्या सामन्यात दोघांनी मिळून टीमला विजय मिळवून दिला. आता ट्रॉफीपर्यंत पोहोचण्याचा मार्गही हे दोघं सुकर करतील असं सांगितलं जातं आहे. 

अश्विन आणि चहलने मुंबई विरुद्धच्या सामन्यात 3 विकेट्स घेतल्या. दोघांनी मिळून 56 धावा दिल्या. अश्विनच्या नावावर एक तर चहलच्या नावावर 2 विकेट्स आहेत. बंगळुरू विरुद्धच्या सामन्यातही दोघं एकत्र विकेट्स काढणार का? हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

पॉईंट टेबलवर राजस्थान टीम पहिल्या स्थानावर आहे. 13 वर्षांनंतर पुन्हा राजस्थान ट्रॉफी जिंकणार का हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहेत.

काय सांगतात हेड टू हेड अंदाज

राजस्थान विरुद्ध बंगळुरू आतापर्यंत 25 सामने खेळले आहेत. त्यापैकी 12 सामने बंगळुरूने जिंकले आहेत. तर 10 सामने राजस्थानने जिंकले आहेत. 3 सामने अनिर्णित राहिले आहेत. 

राजस्थान टीम संभाव्य प्लेइंग इलेव्हन : 

जोस बटलर, यशस्वी जायसवाल, संजू सॅमसन (कर्णधार आणि विकेटकीपर), देवदत्त पडिक्कल, शिमरोन हेटमायर, रियान पराग, रविचंद्रन अश्विन, नवदीप सैनी, ट्रेंट बोल्ट, युजवेंद्र चहल, प्रसिद्ध कृष्णा

बंगळुरू टीम संभाव्य प्लेइंग इलेव्हन : 

फाफ डु प्लेसिस (कर्णधार), अनुज रावत, विराट कोहली, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), शेरफेन रदरफोर्ड, शाहबाज अहमद, वनिन्दु हसरंगा, डेव्हिड विली, हर्षल पटेल, आकाश दीप, मोहम्मद सिराज