दुबईच्या हॉटेलमध्ये Sakshi Dhoni ने जे पाहिले, त्यामुळे तिच्यावर चेहरा लपवण्याची वेळ... पाहा फोटो

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) सध्या त्याच्या आयपीएल (IPL 2021) संघ चेन्नई सुपर किंग्जसोबत (CSK) यूएईमध्ये आहे.

Updated: Aug 25, 2021, 10:41 AM IST
दुबईच्या हॉटेलमध्ये Sakshi Dhoni ने जे पाहिले, त्यामुळे तिच्यावर चेहरा लपवण्याची वेळ... पाहा फोटो

मुंबई : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) सध्या त्याच्या आयपीएल (IPL 2021) संघ चेन्नई सुपर किंग्जसोबत (CSK) यूएईमध्ये आहे. तो आयपीएलच्या उरलेल्या पर्वाची तयारी करत आहे. माही दुबईमध्ये त्याची पत्नी साक्षी आणि मुलगी जीवासोबत देखील वेळ घालवत आहे. या दरम्यानचा  साक्षीने त्या दोघांचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे, ज्यामुळे साक्षी आणि धोनी चर्चेचा विषय बनले आहेत.

दुबईला पोहोचल्यानंतर साक्षी (Sakshi Dhoni) ज्या हॉटेलमध्ये गेली, त्या हॉटेलच्या रुमची सजावट पाहून तिला आश्चर्य वाटले. हॉटेलची रुम पाहून ती लाजली आणि तिने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर या रुमचा एक फोटो शेअर केला. त्यावर साक्षीने सांगितले की, तिला तिचा हनीमून आठवला. साक्षीने यासह लिहिले की, 'या हॉटेलची रुम 11 वर्षांनंतरही.' त्यानंतर पुढे तिने दोन्ही हातांनी चेहरा लपवणारे इमोजीही लावले आहेत.

साक्षी धोनी आणि एमएस धोनी यांचा विवाह 4 जुलै 2010 रोजी झाला होता. त्यांनी गेल्या महिन्यातच त्यांच्या लग्नाला 11 वर्षे पूर्ण केली. खूप वर्षाच्या रिलेशनशीपनंतर धोनी आणि साक्षी यांनी लग्न केलं. तेव्हापासून साक्षी प्रत्येक वेळेला धोनीसोबतच राहते. लाईव्ह सामन्यांच्या दरम्यान अनेकवेळा साक्षी स्टेडियममध्ये माहीला पाठिंबा देण्यासाठी हजर असल्याचे पाहिले गेले आहे.

त्यामुळे या वेळेला साक्षी जेव्हा माही सोबत हॉटेल रुममध्ये गेली, तेव्हा त्या हॉटल रुमची सजावटीने तिला तिच्या 11 वर्षापूर्वीच्या हनिमुनची आठवण आली, ज्यमुळे तिने तो फोटो शेअर केला आहे.

2 वर्षांनंतर, या वर्षी एप्रिलमध्ये भारतात पुन्हा एकदा आयपीएल 2021 (IPL 2021) आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रकरणांमुळे ही मॅच 4 मे रोजी मध्यावर थांबवण्यात आली. आता ही स्पर्धा पुन्हा एकदा यूएईमध्ये 17 सप्टेंबरपासून होणार आहे. तर आयपीएल 2021 चा अंतिम सामना 15 ऑक्टोबर रोजी खेळला जाईल.