U-19 वर्ल्ड कप नाही खेळू शकणार राहुल द्रविडचा मुलगा, 'या' कारणाने स्वप्न अपूर्णच राहणार

समित द्रविडची ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणाऱ्या सीरिजसाठी अंडर 19 टीम इंडियामध्ये निवड झालेली आहे.

Updated: Sep 1, 2024, 01:39 PM IST
U-19 वर्ल्ड कप नाही खेळू शकणार राहुल द्रविडचा मुलगा, 'या' कारणाने स्वप्न अपूर्णच राहणार  title=
(Photo Credit : Social Media)

Rahul Dravid Son Samit Dravid : भारताचा माजी कर्णधार आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड याचा मुलगा समित द्रविड मागील काही दिवसांपासून खूप चर्चेत आहे. समित द्रविडची ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणाऱ्या सीरिजसाठी अंडर 19 टीम इंडियामध्ये निवड झालेली आहे. समित द्रविडची अंडर 19 भारतीय संघात निवड तर झाली मात्र तो 2026 रोजी होणारा अंडर 29 वर्ल्ड कप खेळू शकणार नाही. तसेच जे फॅन्स राहुल द्रविडच्या मुलाला अंडर 19 वर्ल्ड कप खेळताना पाहू इच्छित होते त्या सर्वांसाठी हा मोठा धक्का आहे. 

अंडर 19 वर्ल्ड कप खेळू शकणार नाही राहुल द्रविड : 

समित द्रविड हा डाव्या हाताचा फलंदाज असून तो मिडीयम पेस बॉलर सुद्धा आहे. 10 नोव्हेंबर रोजी समित द्रविडचा 19 वा वाढदिवस आहे. पुढील अंडर 19 वर्ल्ड कप हा 2026 रोजी खेळवला जाईल. मात्र तो पर्यंत समितचं वय हे 20 वर्षाहून अधिक असेल. यामुळेच समित अंडर 19 वर्ल्ड कप खेळू शकणार नाही. समित्र द्रविडचा जन्म हा 10 नोव्हेंबर 2005 रोजी झाला होता. ऑल राउंडर समित सध्या केएससीए महाराजा टी 20 ट्रॉफीमध्ये मैसूर वॉरियर्सकडून खेळत आहेत. 

21 सप्टेंबर पासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरु होणार सीरिज : 

ऑस्ट्रेलिया विरुद्ध आगामी अंडर 19 क्रिकेट सिरीज ही येत्या 21 सप्टेंबर पासून सुरु होणार आहे. तीन सामन्यांची ही वनडे सीरिज ही 21, 23 आणि 26 सप्टेंबर दरम्यान होईल पुडुचेरी येथे होईल ज्यात टीम इंडियाचे नेतृत्व उत्तर प्रदेशचा मोहम्मद अमान हा करेल. तर चेन्नईमध्ये भारत ऑस्ट्रेलिया विरुद्ध चार दिवसीय सामने खेळण्यात येतील. यातील पहिला सामना हा 30 सप्टेंबर तर दुसरा सामना हा 7 ऑक्टोबर रोजी  होईल. तर या सामन्यांसाठी अंडर 19 टीम इंडियाचं कर्णधारपद हे सोहम पटवर्धन याच्याकडे सोपवण्यात आलंय. 

हेही वाचा : राहुल द्रविडच्या मुलाची टीम इंडियात एंट्री, ऑस्ट्रेलिया विरुद्ध सिरीजमध्ये मिळाली संधी 

 

कसं राहिलंय समित द्रविडचं प्रदर्शन : 

समित द्रविड आतापर्यंतच्या टूर्नामेंटमध्ये फार चांगलं प्रदर्शन करू शकला नाही. त्याने 7 सामन्यांमध्ये एकूण 82 धावा केल्या ज्यामध्ये त्याचा सर्वोत्कृष्ट स्कोअर हा 33 असा होता. तर आतापर्यंतच्या टूर्नामेंटमध्ये त्याला गोलंदाजीची संधी मिळालेली नाही. समितने सुरुवातीला बेहार ट्रॉफी ट्रॉफीमध्ये चांगले प्रदर्शन केले होते यात त्याने कर्नाटकला पहिल्यांदा चॅम्पियन बनवण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली होती. 18 व्या वर्षी समितने 8 सामन्यात  362 धावा केल्या आणि जम्मू काश्मीर विरुद्ध 98 धावांची कामगिरी केली होती. या टूर्नामेंटमध्ये त्याने 16 विकेट्स घेतल्या होत्या.