Sara Tendulkar : मध्य रात्री कोणाला भेटायला गेली सारा? मिस्ट्री मॅनला मिठी मारतानाचा VIDEO समोर

Sara Tendulkar : आता सारा तेंडुलकरचा ( Sara Tendulkar ) एक व्हिडीओ समोर आला आहे. यावेळी एका मिस्ट्री मॅनला मिठी मारताना साराचा व्हिडीओ व्हायरल होतोय. 

सुरभि जगदीश | Updated: Jul 4, 2023, 04:19 PM IST
Sara Tendulkar : मध्य रात्री कोणाला भेटायला गेली सारा? मिस्ट्री मॅनला मिठी मारतानाचा VIDEO समोर title=

Sara Tendulkar : सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर ( Sara Tendulkar ) सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत असते. कधी टीम इंडियाचा हँडसम क्रिकेटर शुभमन गिल ( Shubman Gill ) सोबतच्या कथित अफेअरच्या चर्चांमुळे तिचं नाव समोर येतं. तर कधी सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या एखाद्या फोटो किंवा व्हिडीओमुळे ती ट्रेंड होते. अशातच आता सारा तेंडुलकरचा ( Sara Tendulkar ) एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर ( Social Media Viral ) व्हायरल होत असून सारा पुन्हा एकदा चर्चेत आलीये. 

गेल्या काही दिवसांपासून सारा तेंडुलकरचं ( Sara Tendulkar ) नाव टीम इंडियाचा खेळाडू शुभमन गिलसोबत ( Shubman Gill ) जोडलं जातंय. हे दोघंही एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा आहे. सारा नुकतंच केनियाला सुट्टीचा आनंद घ्यायला गेली होती. यानंतर ती पुन्हा मुंबईत परतली आहे. अशामध्ये वांद्रेतील एक रेस्टॉरंट बाहेर सारा ( Sara Tendulkar ) स्पॉट झाली होती. यावेळी एका मिस्ट्री मॅनला मिठी मारताना साराचा व्हिडीओ व्हायरल होतोय. 

व्हायरल होतोय साराचा व्हिडीओ

सोशल मीडियावर साराचा एक मोठ्या प्रमाणावर व्हायरल होताना दिसतोय. लाल रंगाच्या टॉपमध्ये सारा दिसून येतेय. यावेळी रेस्ट्रॉरंटमधून बाहेर पडल्यानंतर एका ओळखीच्या व्यक्तीला सारा ( Sara Tendulkar ) मिठी मारताना दिसतेय. दरम्यान हा मिस्ट्री मॅन कोण आहे, याची माहिती मिळालेली नाही. हा व्हिडीओ पाहून फॅन्स देखील विविध प्रतिक्रिया देतायत. 

सारा-शुभमनच्या डेटची चर्चा

सोशल मीडियावर अशी चर्चा आहे की सारा तेंडुलकर ( Sara Tendulkar ) आणि शुभमन गिल यांच्या अफेअर आहे. मात्र दोघांपैकी कोणीही याबाबत अधिकृत माहिती दिलेली नाही. दरम्यान या दोघांचे अनेक मीम्स देखील व्हायरल होतायत. 2019 साली पहिल्यांदा यांच्या अफेअरची चर्चा रंगली होती. 

आयपीएलदरम्यान मिस्ट्री बॉयसोबत स्पॉट झालेली सारा

यंदाच्या आयपीएलमध्ये सारा तेंडुलकरचा ( Sara Tendulkar ) भाऊ अर्जुन तेंडुलकरने मुंबई इंडियन्सकडून डेब्यू केलं. भावाला सपोर्ट करण्यासाठी बहीण सारा सामना पाहण्यासाठी आली होती. यावेळी सारा तिच्या मित्रांसोबत सामना पाहायला आलेलं दिसून आलं. सारासोबत बसलेला तो मुलगा तिचा मित्र असल्याची माहिती मिळाली होती.