Rohit Sharam: न्यूझीलंडविरुद्धच्या बंगळुरू कसोटीचा दुसरा दिवस भारतीय क्रिकेट संघासाठी सर्वात वाईट सामना ठरला आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय रोहित शर्माने घेतला. पण हा निर्णय भारतीय संघासाठी कामी न येत त्यांनी केवळ 46 धावा केल्या. एम चिन्नास्वामी क्रिकेट स्टेडियमवर टीम इंडियाची फलंदाजी पूर्णपणे फ्लॉप ठरली. 50 धावांच्या आत तो क्षेत्ररक्षणासाठी मैदानात आला तेव्हा कर्णधार रोहित शर्माच्या चेहऱ्यावर निराशा स्पष्ट दिसत होती. याच दरम्यान रोहित शर्मा मैदानावर आक्रमक मूडमध्ये दिसला. त्याचा सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये रोहितला राग आल्याचे स्पष्टपणे दिसत आहे, तो सर्फराझ खानला शिवीगाळ करत असल्याचा दावा केला जात आहे.
रोहित शर्माच्या या व्हिडिओचा ऑडिओ तुम्ही लक्षपूर्वक ऐकला तर तो सरफराजला मिस फिल्डिंगसाठी खडसावत आहे. यादरम्यान रोहितने काही अपशब्दही वापरले.
नाणेफेक जिंकून फलंदाजी करताना भारतीय फलंदाज केवळ 46 धावांवरच मर्यादित राहिले. पहिल्या डावात भारतीय संघ 31.2 षटकात केवळ 46 धावा करू शकला. घरच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या 293 कसोटींमध्ये ही संघाची सर्वात कमी धावसंख्या आहे. भारताच्या पाच फलंदाजांना खातेही उघडता आले नाही. घरच्या कसोटी डावात भारतीय संघाला 50 धावाही करता आल्या नसल्याची ही पहिलीच वेळ आहे. याशिवाय मायदेशातील कसोटीत न्यूझीलंडविरुद्ध भारताचे ५ फलंदाज खातेही उघडू न शकण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी 1999 मध्ये मोहाली कसोटीत असे घडले होते.
तेजश्री गायकवाड- कदम 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा 9 वर्षांचा अनुभव आहे. लोकसत्तामधून त्यांनी कारकिर्दीची सुरुवात केली. लोकसत्ताच्या Viva पुरवणीमधून 7 वर्ष विविध विषयांवर लिखाण केले आहे. दैनिक भास्करच्या 'मधुरिमा' मधून फॅशन विषयांवर लिखाण केले आहे. 'झी 24 तास'च्या आधी त्यांनी नवशक्ती (फ्री प्रेस जर्नल), हिंदुस्थान टाइम्स मराठी डिजिटल, लोकसत्ता ऑनलाईन या वृत्तसंस्थेत लिखित बातम्या आणि व्हिडीओ अशा दोन्ही फॉरमॅटमध्ये काम केले आहे. 2018 ते 2023 पर्यंत मुंबई आकाशवाणीमध्ये व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट आणि कॉन्टेन्ट रायटर म्हणून काम केले आहे. फॅशन, लाइफस्टाईल, मनोरंजन आणि स्पोर्ट्स या विविध विषयांमध्ये रुची आहे.
...Read More|
NZ
|
VS |
IND
|
| India beat New Zealand by 7 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
NZ
|
VS |
IND
|
| India beat New Zealand by 48 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NZ
|
VS |
IND
|
| New Zealand beat India by 41 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.