रांची : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी (Mahendra singh Dhoni) हा जगातील सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून ओळखला जातो. धोनी कर्णधार कसा झाला? याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि बीसीसीआयचे (BCCI) माजी अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी रांचीमध्ये बोलताना एक वक्तव्य केलं. शरद पवार (Sharad Pawar) हे 2005 ते 2008 दरम्यान BCCI चे अध्यक्ष होते.
झारखंडच्या दौऱ्यावर आलेले शरद पवार म्हणाले की, भगवान बिरसा मुंडा यांच्या धरतीवर जन्मलेल्या महेंद्र सिंह धोनीने संपूर्ण झारखंडचं नाव रोशन केलं आहे. एक घटनेचा उल्लेख करताना त्यांनी म्हटलं की, टीम इंडियाचा कर्णधार असताना राहुल द्रविडने मला विचारले की, कर्णधारपदावर असल्याने त्याच्या फलंदाजीवर परिणाम होत आहे. त्यामुळे त्याला राजीनामा द्यायचा आहे.
सचिन तेंडुलकरने सूचवला होता पर्याय
शरद पवारांनी म्हटलं की, राहुल द्रविडने राजीनामा देण्याबाबत विचारणा केली असता मी सचिन तेंडुलकरला (Sachin Tendulkar) कर्णधारपद घेण्यासाठी सुचवलं होतं. पण सचिनने ही जबाबदारी सांभाळण्यास नकार दिला. तर मी सचिनला विचारलं की, तर मग ही जबाबदारी कोणाला देऊ. त्यावर तेंडुलकरने धोनीच्या खांद्यावर ही जबाबदारी देण्याचा सल्ला दिला. तो देशाचं नाव उंचावर नेईल. आणि नंतर तसंच झालं.
महेंद्रसिंह धोनीने 2014 मध्ये टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. त्यानंतर धोनीची जबाबदारी विराटच्या खांद्यावर आली. धोनीने 2004 मध्ये बांगलादेश विरुद्ध वनडेमध्ये पदार्पण केले. येथून धोनीने नंतर कधीच मागे वळून पाहिलं नाही. एक उत्तर फिनीशर म्हणून त्याची ओळख झाली. त्यानंतर त्याचा प्रवास सर्वात यशस्वी कर्णधारपर्यंत येऊन पोहोचला.
धोनीच्या नेतृत्वात भारतीय संघाने 2007 साली पहिलाा टी-20 वर्ल्डकप जिंकत इतिहास रचला. धोनाच्या नावावर १७ हजार धावा आहेत. तसेच टी-२०, वर्ल्ड कप आणि चॅम्पियन्स ट्रॉफी अशा तिन्ही स्पर्धा जिंकणारा महेंद्रसिंह धोनी हा पहिला कर्णधार आहे.
या गोष्टी तुम्हाला माहित आहेत? (Dhoni's Records)
- महेंद्रसिंह धोनी हा तिसरा सर्वात यशस्वी विकेटकीपर आहे. ज्याने 500 सामन्यांमध्ये 780 विकेट घेतल्या आहेत. धोनीच्या पुढे दक्षिण आफ्रिकेचा मार्क बाऊचर आणि दुसर्या स्थानावर ऑस्ट्रेलियाचा अॅडम गिलक्रिस्ट आहे. ज्यांनी अनुक्रमे 998 आणि 905 विकेट घेतल्या आहेत.
- क्रिकेटमध्ये सर्वाधिक स्टंपिंगचा रेकॉर्ड ही धोनीच्याच नावावर आहे. त्याने एकूण 178 स्टंपिंग्स केलेत.
- धोनी टी-20 मधील सर्वात यशस्वी विकेटकीपर आहे. त्याने 82 विकेट घेतल्या आहेत.
- धोनीने वनडेत 217 सिक्स मारले आहेत. धोनी या यादीत चौथ्या क्रमांकावर असून कर्णधार म्हणूनही त्याने सर्वाधिक सिक्स मारले आहेत.
- धोनी हा 7 व्या क्रमांकावर फलंदाजी करताना सर्वाधिक शतके ठोकणारा फलंदाज आहे.
- धोनीने 9 वेळा गोलंदाजी देखील केली होती. त्याने वेस्ट इंडीज विरुद्ध 2009 मध्ये पहिली विकेट घेतली आहे.
- अफ्रो आशियाई चषक स्पर्धेत माहेला जयवर्धनेसह 218 धावांची भागीदारी अद्यापपर्यंतची सर्वात मोठी भागीदारी आहे, हा विश्वविक्रम आहे.
- सलग 2 वेळा ICC वनडे क्रिकेटर ऑफ द इयर बनलेला धोनी पहिला खेळाडू आहे.