धक्कादायक! सामन्यात खेळाडूनं फुटबॉलसारखं उडवलं हेल्मेट, पाहा व्हिडीओ

क्रिझवरच्या 'त्या' कृतीवर संतापला अंपायर आणि इतर खेळाडू... पाहा नेमकं काय घडलं LIVE मॅचमध्ये व्हिडीओ

Updated: Nov 25, 2021, 05:51 PM IST
धक्कादायक! सामन्यात खेळाडूनं फुटबॉलसारखं उडवलं हेल्मेट, पाहा व्हिडीओ  title=

ऑस्ट्रेलिया: सामना सुरू असताना क्रीझवर पडलेलं हेल्मेट पायाने फुटबॉलसारखं उडवल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे खेळाडू आणि अंपायरने संताप व्यक्त केला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेमुळे क्रीडा विश्वात मोठा वादाचा मुद्दा निर्माण झाला आहे. 

ऑस्ट्रेलियामध्ये सध्या शेफील्ड शील्ड सामने सुरू आहेत. 4 दिवसांच्या टुर्नामेंटमध्ये क्विंसलँड आणि साऊथ ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना सुरू आहे. या सामन्या दरम्यान एक घटना घडली आहे. या घटनेमुळे क्रिकेटपटूच्या खिलाडी वृत्तीवर प्रश्नचिन्हं उपस्थित करण्यात आलं आहे.

सामना सुरू असताना क्रिझवर हेल्मेट पडल्याचं दिसताच बॅटरने रागात लाथ मारून ते हेल्मेट उडवून दिलं. या घटनेनंतर विरुद्ध टीमचे खेळाडू आणि अंपायर या खेळाडूवर संतापले. ऑस्ट्रेलिया वेबसाईटवर याचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. 

आठव्या ओवर दरम्यान हेनरी हंट आणि नॉन स्ट्राइकर जॅक वीदराल्ड काबिज होते. स्पिनरने बॉल टाकला आणि मात्र रन होऊ शकला नाही. ओवर संपल्यानंतर फिल्डर बदलला आणि त्यानंतर ग्राऊंडवर ठेवण्यात आलेलं हेल्मेट रागाच्या भरात खेळाडूनं लाथ मारून उडवून लावलं. 

या क्रिकेटपटूला अंपायरने समजावलं मात्र तरीही त्याचं वागणं बदललं नाही. हा व्हिडीओ पाहून असं वाटतं आहे की बॅटर हे हेल्मेट इथे का आहे असं संतापाने विचारत आहे. आणखी कोणती जागा मिळाली नाही का? हा अॅटीट्युड बॅटरच्या असल्याचं दिसत आहे.