शिखर धवननं मोडलं सौरव गांगुलीचं रेकॉर्ड

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमी फायनलमध्ये शिखर धवननं सौरव गांगुलीचा रेकॉर्ड मोडलं आहे. 

Updated: Jun 15, 2017, 08:58 PM IST
शिखर धवननं मोडलं सौरव गांगुलीचं रेकॉर्ड  title=

लंडन : चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमी फायनलमध्ये शिखर धवननं सौरव गांगुलीचा रेकॉर्ड मोडलं आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सर्वाधिक रन्स बनवणारा भारतीय खेळाडू ठरला आहे.  याआधी सौरव गांगुलीच्या नावावर हे रेकॉर्ड होतं. गांगुलीनं चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये ६६५ रन्स बनवल्या होत्या. बांग्लादेशविरुद्धच्या मॅचमध्ये थवन ४६ रन्स बनवून आऊट झाला.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या मॅचमध्येही धवननं रेकॉर्डला गवसणी घातली होती. आयसीसी टूर्नामेंट्समध्ये सर्वात जलद एक हजार रन्स बनवण्याचं रेकॉर्ड धवननं केलं आहे. आयसीसी टूर्नामेंट्समध्ये एक हजार रन बनवायला धवनला १६ इनिंग लागल्या. हेच रेकॉर्ड सचिन तेंडुलकरनं १८ इनिंगमध्ये आणि सौरव गांगुली, हर्षल गिब्स आणि मार्क वॉनं २० इनिंगमध्ये केलं होतं.

याचबरोबर आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सर्वात जास्त ५० रन्स बनवण्याच्या रेकॉर्डचीही धवननं बरोबरी केली आहे. धवननं आत्तापर्यंत चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सहा अर्धशतकं झळकवली आहेत. राहुल द्रविड आणि सौरव गांगुलीनंही चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सहा अर्धशतकं केली आहेत.