'जेवढे तुझ्या डोक्यावर केस नाहीत, तेवढे...' शोएब अख्तरचा सेहवागवर निशाणा

पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरने वीरेंद्र सेहवागवर निशाणा साधला आहे.

Updated: Jan 23, 2020, 05:52 PM IST
'जेवढे तुझ्या डोक्यावर केस नाहीत, तेवढे...' शोएब अख्तरचा सेहवागवर निशाणा

मुंबई : पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरने वीरेंद्र सेहवागवर निशाणा साधला आहे. सेहवागच्या डोक्यावर जेवढे केस नाहीत, तेवढे पैसे माझ्याकडे आहेत, असं शोएब अख्तर म्हणाला आहे. 'रावळपिंडी एक्स्प्रेस' नावाने प्रसिद्ध असलेला शोएब अख्तर त्याच्या युट्युब चॅनलवर नेहमीच वेगवेगळ्या क्रिकेट मॅचची समिक्षा करतो. यावेळी मात्र त्याने सेहवागवर टीका केली.

'माझा मित्र सेहवागचा एक जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे. शोएब पैशांसाठी भारताचं कौतुक करतो, असं सेहवाग त्या व्हिडिओमध्ये म्हणाला आहे. पण जितने उसके सर पर बाल नहीं है, उतना ही मेरे पास माल होगा. सेहवाग वाईट वाटून घेऊ नकोस, मी मस्करी करत आहे,' असं शोएब म्हणाला.

'भारत यावेळी जगातली नंबर-१ची टीम आहे. विराट कोहली जगातला नंबर-१चा खेळाडू आहे. काहीच दिवसांपूर्वी भारताने ऑस्ट्रेलियाला हरवलं. जेव्हा ते चांगलं खेळतात तेव्हा त्यांचं कौतुक का करु नये? जेव्हा ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव केला होता, तेव्हा मी त्यांच्यावर टीका केली होती,' अशी प्रतिक्रिया अख्तरने दिली.

'मी १५ वर्ष पाकिस्तानकडून क्रिकेट खेळलो. युट्युब चॅनलमुळे मी प्रसिद्ध झालो नाही. मी जगातला सगळ्यात जलद बॉलर होतो. जगात मी प्रसिद्ध आहे. फक्त हिंदूस्तान नाही तर बांगलादेश आणि ऑस्ट्रेलियामध्येही माझे प्रशंसक आहेत,' असं शोएबने सांगितलं.