एकच नंबर! गल्ली क्रिकेटमधील विचित्र षटकार पाहिला?

सोशल मीडियावर या व्हिडिओला असंख्य व्ह्यूज...   

Updated: May 29, 2020, 09:09 AM IST
एकच नंबर! गल्ली क्रिकेटमधील विचित्र षटकार पाहिला?
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : येsssss माराsss असे शब्द कातनांवर येताच क्रिकेटच्या मैदानाचं चित्र नकळतपणे डोळ्यांसमोर उभं राहतं. या चित्रात क्रिकेटचा रंगात आलेला सामना, फलंदाजी नव्हे तर फटकेबाजी करणारा खेळाडू आणि त्याला बाद  करण्यासाठी म्हणून गोलंदाजी करणारा विरोधी पक्षातील खेळाडू असे चेहरेही डोळ्यांसमोर उभे राहतात. असंच काहीसं चित्र सध्या सोशल मीडियायवरील एका व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. 

भारतामध्ये एखाद्या पंथाप्रमाणे रुजलेला क्रिकेट हा खेळ म्हणजे अनेकांचा जीव की प्राण. अशा या खेळाच्या माध्यामातून आजच्या घडीला कित्येक खेळाडूंना लोकप्रियता आणि यश मिळालं. यातच आता हा खेळ पुन्हा एकदा एका स्थानिक, गल्ली क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूच्या अफलातून खेळाची झलक सर्वांपर्यंत आणली आहे. 

एखादा खेळाडू हा ज्याप्रमाणं त्याच्या अफलातून क्रिकेट शैलीसाठी ओळखला जातो, त्याचप्रणाणे हा पठ्ठ्या त्याच्या धमाकेदार षटकारासाठी लाखो व्ह्यूअर्सची मनं जिंकत आहे. महेंद्रसिंह धोनीच्या हॅलिकॉप्टर शॉटच्याही पलीकडे जात एक दमदार फटका मारत या मित्रानं चेंडू पार सीमारेषपलीकडे पाठवल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. बरं तेसुद्धा इतक्या अफलातून अंदाजा की बस रे बस. 

@shameersyam

different shot ##cricketlover

♬ original sound - iqbal Kandiga

सहसा सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. पण, हा व्हिडिओ खऱ्या अर्थानं खास आहे. त्यामुळं आता विचित्र पण, तितकाच लक्षवेधी षटकार मारणाऱ्या या 'गल्ली क्रिकेट स्टार'ची बडे क्रिकेटपटू दखल घेतायत का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.