VIDEO: 'या' बॉलरने टी-२० मध्ये रचला इतिहास

क्रिकेटमध्ये नवनवे रेकॉर्ड्स बनत असतात. सध्या टिम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली आणि धोनी यांची चर्चा सुरु आहे. कारण, दोघांनीही एका नवा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. तर तिकडे आणखीन एका बॉलरने नवा रेकॉर्ड केला आहे.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Sep 1, 2017, 08:35 PM IST
VIDEO: 'या' बॉलरने टी-२० मध्ये रचला इतिहास title=
Image from Twitter

नवी दिल्ली : क्रिकेटमध्ये नवनवे रेकॉर्ड्स बनत असतात. सध्या टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली आणि धोनी यांची चर्चा सुरु आहे. कारण, दोघांनीही एका नवा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. तर तिकडे आणखीन एका बॉलरने नवा रेकॉर्ड केला आहे.

या बॉलरने असा कारनामा केला आहे जो टी-२० क्रिकेटच्या इतिहासात अद्याप कुणीच केलेला नाहीये. टी-२० क्रिकेटमध्ये बॅट्समनला रेकॉर्ड करण्याची मोठी संधी असते. पण असे असताना या बॉलरने रेकॉर्ड केल्याने सध्या त्याची जोरदार चर्चा सुरु आहे.

आम्ही ज्या बॉलरसंदर्भात बोलत आहोत त्या बॉलरचं नाव आहे सोहेल तनवीर. फास्ट बॉलर असलेला सोहेल तनवीर हा पाकिस्तानमधील आहे.

पहिला विकेट

दुसरा विकेट

तिसरा विकेट

चौथा विकेट

पाचवा विकेट

गयाना अमेझन वॉरियर्सतर्फे खेळणा-या सोहेलने कॅरेबियन प्रिमियर लीगमध्ये केवळ ३ रन्स देत ५ विकेट्स घेतले आहेत. सोहेलने केलेल्या या कारनाम्यामुळे प्रतिस्पर्धी बारबोडासची टीम केवळ ५९ रन्सवर ऑल आऊट झाली.

सोहेलने टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात इकोनॉमिकल ओव्हर टाकली. त्याने चार ओव्हर्समध्ये एक ओव्हर मेडन टाकली आणि इतर ओव्हरमध्ये केवळ ३ रन्स देत ५ विकेट्स घेतले. त्यापैकी ४ बॅट्समन शुन्यावर आऊट झाले.