विश्वविजेती सौम्या स्वामीनाथनची चेस चॅम्पिअनशिपमधून माघार

माजी ज्यूनिअर विश्वविजेती सौम्या स्वामीनाथननं इराणमध्ये होणाऱ्या एशियन टीम चेस चॅम्पिअनशिपमधून माघार घेतील.

Updated: Jun 13, 2018, 11:57 AM IST
विश्वविजेती सौम्या स्वामीनाथनची चेस चॅम्पिअनशिपमधून माघार title=

मुंबई : भारताची महिला ग्रँडमास्टर आणि माजी ज्यूनिअर विश्वविजेती सौम्या स्वामीनाथननं इराणमध्ये होणाऱ्या एशियन टीम चेस चॅम्पिअनशिपमधून माघार घेतील.  सौम्याने इस्लामिक देश इराणमध्ये स्कार्फ अथवा हिजाब घालणं अनिवार्य असल्यामुळे  आणिी हे आपल्या वैयक्तिक अधिकारांचं उल्लंघन असल्याचं सांगत हा निर्णय घेतला आहे. २६ जुलै ते ४ ऑगस्ट दरम्यान एशियन चॅम्पियनशिप पार पडणार आहे. इराणमध्ये महिलांनी बुरखा घालणं अनिवार्य आहे.  मात्र, सौम्या स्वामीनाथनने इराणचा हा हुकूमशाही कायदा मानायला नकार दिलाय.

सौम्यानं नाव मागे घेतलं असल्यामुळे आता सर्वांच्या नजरा डी हरिका आणि पद्मिनी राऊत यांच्यावर असणार आहेत. त्यांच्याकडून भारताला अपेक्षा आहेत. इराणमधील या स्पर्धेत जिंकणारा संघ वर्ल्ड टीम चेस चॅम्पियनशिपसाठी पात्र ठरेल.

भारताची महिला ग्रॅण्डमास्टर आणि माजी ज्यूनिअर वर्ल्ड चॅम्पिअन सौम्या स्वामीनाथनने इराणमध्ये होणाऱ्या एशियन टीम चेस चॅम्पिअनशिपमधून आपलं नाव मागे घेतलं आहे. सौम्याने इस्लामिक देश इराणमध्ये स्कार्फ किंवा हिजाब घालणं अनिवार्य असल्या कारणाने हे आपल्या वैयक्तिक अधिकारांचं उल्लंघन असल्याचं सांगत हा निर्णय घेतला आहे. २६ जुलै ते ४ ऑगस्ट दरम्यान एशियन चॅम्पिअनशिप पार पडणार आहे. इराणमध्ये महिलांनी बुरखा घालणं अनिवार्य आहे. पण सौम्या स्वामीनाथनने इराणचा हा हुकूमशाही कायदा मानण्यास नकार दिला आहे. यामुळेच सौम्याने स्पर्धेतून माघार घेतली आहे.

सौम्याने एशियन टीम चेस चॅम्पिअनशिपमधून माघार घेत असल्याची माहिती आपल्या फेसबुक अकाऊंटवरुन दिली आहे. सौम्याने फेसबुकवर लिहिलं आहे की, ‘माझ्यावर स्कार्फ किंवा बुरखा घालण्याची जबरदस्ती व्हावी अशी इच्छा नाही. मला वाटतं स्कार्फ किंवा बुरखा घालण्याचा इराणचा हा कायदा माझ्या मानवी अधिकारांचं उल्लंघन आहे. तसंच अभिव्यक्ती स्वातंत्र्य, विचारांचं स्वातंत्र्य, कर्तव्याची जाणीव आणि धर्माचंही उल्लंघन आहे. अशा परिस्थितीत माझ्या हक्कांची सुरक्षा करण्यासाठी माझ्यासमोर एकच मार्ग आहे तो म्हणजे मी इराणला जाऊ नये’.

सौम्याने लिहिलं आहे की, प्रत्येक वेळी जेव्हा राष्ट्रीय संघात आपली निवड होते आणि भारताचं प्रतिनिधित्व करते तेव्हा सन्मानजनक वाटतं. तिने सांगितलंय की, ‘एका महत्वाच्या चॅम्पिअनशिपमध्ये सहभागी होण्यात मी असमर्थ असल्याचं मला प्रचंड दुख आहे’. पुढे ती म्हणतीये की, ‘एक खेळाडू नेहमी खेळाला आपल्या खासगी आयुष्यापेक्षा जास्त महत्व देतो. यासाठी तो अनेक तडजोडी करतो. पण काही गोष्टी अशा असतात ज्यांच्यासोबत तडजोडी केल्या जाऊ शकत नाहीत’.

सौम्याने नाव मागे घेतलं असल्या कारणाने आता सर्वांच्या नजरा डी हरिका आणि पद्मिनी राऊत यांच्यावर असणार आहेत. त्यांच्याकडून भारताला अपेक्षा आहेत. इराणमधील या स्पर्धेत जिंकणारा संघा वर्ल्ड टीम चेस चॅम्पिअनशिपसाठी पात्र ठरेल.