Sourav Ganguly: 'टीम इंडियाला World Cup जिंकायचा असेल तर...', सौरव गांगुलीने दाखवला गोल्डन मार्ग!

ODI World Cup 2023: सर्व क्रिकेट संघांनी एकदिवसीय विश्वचषकाची तयारी सुरू केली आहे. तर दुसरीकडे भारतीय संघात (Team India) इन आऊट सुरू असल्याचं दिसतंय. त्यामुळे अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. 

Updated: Jan 29, 2023, 03:11 PM IST
Sourav Ganguly: 'टीम इंडियाला World Cup जिंकायचा असेल तर...', सौरव गांगुलीने दाखवला गोल्डन मार्ग! title=
Sourav Ganguly,ODI World Cup 2023

Sourav Ganguly On Team India: आगामी वनडे वर्ल्ड कपसाठी (ODI World Cup 2023) आता फक्त काही महिनेच शिल्लक आहेत. टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये दारूण पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर आता वनडे वर्ल्ड कप जिंकण्याच्या तयारीने टीम इंडिया मैदानात उतरणार आहे. गेल्या 10 वर्षांपासून आयसीसीची (ICC) एकही स्पर्धा जिंकलेली नाही. त्यामुळे यंदा भारतातच आयोजित केला जाणारा वर्ल्ड कप भारतच जिंकेल, अशी सर्वांना अपेक्षा आहे. अशातच आता टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि स्टार खेळाडू सौरव गांगुलीने (Sourav Ganguly) मोठं वक्तव्य केलंय. (Sourav Ganguly has given valuable advice to indian captain Rohit Sharma Before ODI World Cup 2023)

सर्व क्रिकेट संघांनी एकदिवसीय विश्वचषकाची तयारी सुरू केली आहे. तर दुसरीकडे भारतीय संघात इन आऊट सुरू असल्याचं दिसतंय. त्यामुळे अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. अशातच आता सौरव गांगुलीने कॅप्टन रोहित शर्माला (Rohit Sharma) मोलाचा सल्ला दिला आहे.

काय म्हणाला Sourav Ganguly?

भारत हा कधीही कमकुवत संघ असू शकत नाही. ज्या देशात इतकं मोठं टॅलेंट आहे, त्याचा संघ कधीच कमकुवत होऊ शकत नाही. निम्म्या खेळाडूंना संधीही मिळत नाही. विश्वचषकापर्यंत राहुल द्रविड (Rahul Dravid), रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि निवडकर्त्यांनी एकाच संघात राहावं, अशी माझी इच्छा आहे, असं गांगुली म्हणाला आहे. त्याचं हे वक्तव्य बीसीसीआयला (BCCI) उद्देशून होतं का?, असा सवाल उपस्थित होताना दिसतोय.

आणखी वाचा - Team India : टीम इंडियाचे 'हे' दोन खेळाडू होणार भावी कप्तान, आकाश चोप्राची मोठी भविष्यवाणी!

टीम इंडियाने आगामी वर्ल्ड कपमध्ये कोणत्याही दबावाखाली न येता खेळलं पाहिजे. मग वर्ल्ड कपच्या ट्रॉफी जिंकू किंवा नाही, त्याने फरक पडत नाही. ज्या टीममध्ये रोहित शर्मा, विराट कोहली (Virat Kohli), सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav), जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah), रवींद्र जडेजा आणि हार्दिक पांड्या (hardik pandya) सारखे खेळाडू आहेत, तो संघ कमकूवत असूत शकत नाही, असंही गांगुली म्हणालाय.

दरम्यान, टीम इंडिया विश्वचषक (ODI World Cup 2023) जिंकण्यासाठी प्रबळ दावेदार असल्याचं दिसत आहे. भारताने आतापर्यंत दोन वेळा एकदिवसीय वर्ल्ड कप जिंकलाय. त्यामुळे या वर्षी देखील वर्ल्ड कप जिंकून भारत पुन्हा विश्वविजेता होईल, अशी आशा सर्वांना लागली आहे.