Sourav Ganguly prediction on T20 World Cup 2022 SF : टी-20 वर्ल्ड कपच्या थराराला सुरूवात झाली असून भारताने कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तान संघाचा पराभव करत दमदार सुरूवात केली आहे. ऑस्ट्रेलियामध्ये सुरू असलेल्या वर्ल्ड कपमध्ये सर्व संघ तोडीस तोड प्रदर्शन करत आहे. त्यामुळे आता सुपर 12 मध्ये मोठी चुरस असून अंतिम चारमध्ये कोणते संघ प्रवेश करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. अशातच माजी खेळाडू आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुलीने मोठी भविष्यवाणी केली आहे. (T-20 World Cup 2022 Semi Final team prediction Sairav Ganguly)
भारत, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड उपांत्य फेरी गाठू शकतात. दक्षिण आफ्रिकेकडे चांगली गोलंदाजी आहे, जी त्यांना ऑस्ट्रेलियन परिस्थितीत मदत करेल. आधी काय झाले, त्याचा विचार करू नये. भारत ही स्पर्धा जिंकण्याच्या प्रबळ दावेदारांपैकी एक असेल. आमचा संघ खूप मजबूत आहे, संघात मोठे हिटर आहेत परंतू टी-20 क्रिकेटमध्ये फॉर्म असणंही तितकंच महत्त्वाचं असल्याचं सौरव गांगुलीने म्हटलं आहे.
गेल्या वर्षी अंतिम फेरीत पोहोचलेल्या न्यूझीलंड संघाला गांगुलीने अंतिम चारमध्ये स्थान दिलं नाही. मात्र आताचा फॉर्म पाहता न्युझीलंड संघही धोकादायक मानला जात आहे. गांगुलीने पाकिस्तान संघालाही या यादीतून वगळलं आहे. न्यूझीलंडने पहिल्याच सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियाचा 89 धावांनी पराभव केला. भारताने पहिल्या सामन्यात पाकिस्तानलाही पराभूत केले पण त्यांचे फलंदाज फॉर्ममध्ये आहेत.
दरम्यान, आता काही दिवसाच कोणते संघ अंतिम चारमध्ये स्थान मिळवणार हे स्पष्ट होणार आहे. भारताचा संघही मजबूत असलेला पाहायला मिळत आहे. के. एल. राहुल आणि कर्णधार रोहित शर्मा पहिल्या सामन्यात फेल ठरले मात्र आता दुसऱ्या सामन्यामध्ये त्यांना पुन्हा फॉर्म मिळण्यासाठी संधी आहे.