वेस्ट इंडिजविरुद्ध या खेळाडूंना न निवडल्यामुळे गांगुली हैराण

वेस्ट इंडिजविरुद्धच्या सीरिजसाठी टीम इंडियाची रविवारी घोषणा करण्यात आली.

Updated: Jul 25, 2019, 07:38 PM IST
वेस्ट इंडिजविरुद्ध या खेळाडूंना न निवडल्यामुळे गांगुली हैराण title=

कोलकाता : वेस्ट इंडिजविरुद्धच्या सीरिजसाठी टीम इंडियाची रविवारी घोषणा करण्यात आली. भारताच्या वनडे टीममध्ये अजिंक्य रहाणे आणि शुभमन गिल यांची निवड न झाल्यामुळे सौरव गांगुली निराश झाला आहे. 'टीममध्ये असे बरेच खेळाडू आहेत, जे सगळ्या फॉरमॅटमध्ये खेळू शकतात. शुभमन गिल आणि रहाणेला वनडे टीममध्ये न बघून मी हैराण झालो,' असं गांगुली म्हणाला.

'भारताच्या निवड समितीने सगळ्या फॉरमॅटसाठी समान खेळाडूंची निवड केली पाहिजे. यामुळे खेळाडूंचा आत्मविश्वास वाढतो. काही खेळाडू सगळ्या फॉरमॅटमध्ये खेळतात. जगातल्या सर्वोत्तम टीममध्ये सातत्याने चांगली कामगिरी करणारे खेळाडू आहेत. निवड ही सगळ्यांना खुश करण्यासाठी केली जाऊ नये. देशासाठी सगळ्यात चांगल्या खेळाडूंची निवड झाली पाहिजे,' असा सल्ला गांगुलीने दिला आहे.

टी २० सीरिजसाठीची टीम :

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उप कर्णधार), धवन, के.एल.राहुल, श्रेयश अय्यर, मनिष पांड्ये, रिषभ पंत ( विकेट किपर), कृणाल पांड्या, रविंद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, राहुल चहर, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद, दीपक चहर, नवदिप सैनी

वनडे सीरिजसाठीची टीम :

विराट कोहली (कर्णधार),  रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, के.एल. राहुल, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (यष्टीरक्षक),  रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, केदार जाधव, मोहम्मद, भुवनेश्वर कुमार, नवदीप सैनी, खलील अहमद

टेस्ट सीरिजसाठी टीम :

विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), मयांक अग्रवाल, के.एल. राहुल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रोहित शर्मा, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमरा, उमेश यादव, इशांत शर्मा