रशिदच्या धुलाईनं संतापला कोच, स्टेडियममध्ये बॉलरला शिवीगाळ, पाहा व्हिडीओ

राशिद खानचा नाद नाही करायचा! कोचचा चढला पारा, शिवीगाळ केल्याचा व्हिडीओ व्हायरल 

Updated: Apr 28, 2022, 12:04 PM IST
रशिदच्या धुलाईनं संतापला कोच, स्टेडियममध्ये बॉलरला शिवीगाळ, पाहा व्हिडीओ  title=

मुंबई : आयपीएलच्या पाचव्या हंगामात सलग पाचवा विजय मिळवण्यासाठी कंबर कसलेल्या हैदराबाद टीमचे इरादे राशिद खानने उधळून लावले. राशिद खान आणि राहुल तेवतियाने मिळून गुजरात टीमला विजय मिळवून दिला. गुजरात टीमने 5 विकेट्सने हैदराबादवर मात केली.

गुजरातला शेवटच्या ओव्हरमध्ये 22 धावांची आवश्यकता होती. त्यावेळी राशिद खाननं शेवटचे 3 षटकार ठोकून विजय मिळवून दिला. हैदराबादच्या विजयी रथाला रोखण्यात गुजरात टीम यशस्वी ठरली. हैदराबाद टीमच्या गोलंदाजांनी उत्तम कामगिरी केली. 

या सामन्यात हैदराबादचे कोच मुथय्या मुरलीधरन रागानं लालबुंद झाल्याचं पाहायला मिळालं. हैदराबादकडून सामना गेल्यानंतर मुथय्या स्टेडियममध्ये पाय आपटत अपशब्द बोलत असल्याचं कॅमेऱ्यात कैद झालं. 

विराट कोहलीची विकेट जशी यानसनने काढली होती तशीच विकेट काढण्यासाठी शेवटची ओव्हर पुन्हा त्यालाच देण्यात आली. मात्र या ओव्हरमध्ये त्याने चांगलाच मार खाल्ला. विकेट काढण्याऐवजी 25 धावा दिल्या. या सामन्यानंतर टीमचे कोच मुरलीधरन संतापल्याचं पाहायला मिळालं. यावेळी त्यांच्या तोंडातून अपशब्दही निघाल्याची चर्चा आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

कोचनं असं वागणं शोभतं का? असा संतप्त प्रश्न अनेक युजर्सनी केला आहे. मुरलीधरन यांचा व्हिडीओ मॅच संपल्यानंतर चांगलाच चर्चेत आल्याचं पाहायला मिळालं.