श्रीलंकेचा क्रिकेटपटू कुसल मेंडिसला अटक

श्रीलंकेचा विकेट कीपर बॅट्समन कुसल मेंडिस याला पोलिसांनी अटक केली आहे.

Updated: Jul 5, 2020, 05:42 PM IST
श्रीलंकेचा क्रिकेटपटू कुसल मेंडिसला अटक

कोलंबो : श्रीलंकेचा विकेट कीपर बॅट्समन कुसल मेंडिस याला पोलिसांनी अटक केली आहे. कुसल मेंडिसच्या गाडीने टक्कर दिल्यामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचा आरोप आहे. कोलंबोचं उपनगर असलेल्या पनादुरामध्ये ६४ वर्षांच्या व्यक्तीला एका गाडीने टक्कर दिली. यानंतर या व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलं. हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना या व्यक्तीचा मृत्यू झाला.

कुसल मेंडिसला पुढच्या ४८ तासांमध्ये मॅजिस्ट्रेटसमोर उभं केलं जाईल. कोरोना लॉकडाऊननंतर श्रीलंकेच्या टीमने १२ दिवसांच्या ट्रेनिंगला सुरुवात केली होती. या ट्रेनिंगमध्ये कुसल मेंडिस होता. २५ वर्षांच्या कुसल मेंडिसने श्रीलंकेसाठी ४४ टेस्ट आणि ७६ वनडे मॅच खेळल्या आहेत. 

कोरोना व्हायरसमुळे श्रीलंका टीमचा दौरा आधीच रद्द झाला आहे. तरीही श्रीलंकेच्या टीमने सरावाला सुरुवात करण्याचा निर्णय घेतला. मेंडिसने २०१५ साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. टेस्टमध्ये मेंडिसने ७ शतकं आणि ११ अर्धशतकं, तर वनेडमध्ये त्याने २ शतकं आणि १७ अर्धशतकं केली आहेत.