AFG vs SL: आशा आहे की...; अफगाणिस्तानविरूद्धच्या पराभवामुळे संतापला श्रीलंकेचा कर्णधार

AFG vs SL:  सोमवारी पुण्याच्या एमसीए स्टेडियमवर अफगाणिस्तान विरूद्ध श्रीलंका ( Afghanistan vs Sri Lanka ) यांच्यात सामना रंगला होता. या सामन्यात पुन्हा एकदा मोठा उलटफेर पहायला मिळाला. 

सुरभि जगदीश | Updated: Oct 31, 2023, 07:08 AM IST
AFG vs SL: आशा आहे की...; अफगाणिस्तानविरूद्धच्या पराभवामुळे संतापला श्रीलंकेचा कर्णधार title=

AFG vs SL: सोमवारी पुण्याच्या एमसीए स्टेडियमवर अफगाणिस्तान विरूद्ध श्रीलंका ( Afghanistan vs Sri Lanka ) यांच्यात सामना रंगला होता. या सामन्यात पुन्हा एकदा मोठा उलटफेर पहायला मिळाला. यावेळी अफगाणिस्तानने श्रीलंकेचा 7 विकेट्सने पराभव केला आहे. या पराभवानंतर श्रीलंकेचा कर्णधार कुशल मेंडिस निराश दिसला. यावेळी सामन्यानंतर त्याने श्रीलंकेच्या खेळाडूंवर पराभवाचं खापर फोडलं आहे. 

कुशल मेंडिसने सांगितलं पराभवाचं कारण

अफगाणिस्तानविरुद्धच्या ( Afghanistan vs Sri Lanka ) पराभव स्विकारल्यानंतर कुसल मेंडिसने पोस्ट प्रेझेंटेशन सेरेमनीमध्ये सांगितलं की, आम्ही फलंदाजीमध्ये चांगली कामगिरी केली नाही. 300 किंवा कदाचित 280 रन्स पुरेसे झाले असते, पण तसंही नाही. पहिल्या 10 ओव्हर्समध्ये गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. त्यानंतर मैदानात थोडे दव आलं आणि नंतर स्पिनर्सना गोलंदाजी करणं थोडं कठीण झालं. मधुशंकाने पहिल्या काही सामन्यांमध्येही चांगली कामगिरी केली. आशा आहे की तो पुढेही आपला फॉर्म कायम ठेवेल.

या सामन्यात अफगाणिस्तानने ( Afghanistan vs Sri Lanka ) टॉस जिंकून प्रथम श्रीलंकेला फलंदाजीसाठी आमंत्रण दिलं. यावेळी पहिल्यांदा फलंदाजी करताना श्रीलंकेने 10 विकेट्स गमावून 241 रन्स केले. लंकेकडून पथुम निसांकाने सर्वाधिक रन्स केले. त्याने 46 रन्सचं योगदान दिलं. मात्र याशिवाय एकाही फलंदाजाला मोठी खेळी खेळता आली नाही. 241 रन्सवर श्रीलंकेची टीम ऑलआऊट झाली. अफगाणिस्तानने 45.2 ओव्हर्समध्ये 3 विकेट्स गमावून हा सामना जिंकला. 

कुशल मेंडिसची खराब कामगिरी

अफगाणिस्ताविरूद्धच्या ( Afghanistan vs Sri Lanka ) सामन्यात श्रीलंकेचा कर्णधार कुसल मेंडिस फार मोठी कामगिरी करू शकला नाही. या सामन्यात त्याने 50 बॉल्समध्ये 39 रन्सची खेळी खेळली. अफगाण गोलंदाजांसमोर तो धिम्या गतीने फलंदाजी करत होता. या सामन्यात त्याने 78.00 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली. आतापर्यंत एकाही वर्ल्डकपच्या सामन्यात कुशल मेंडिसला मोठी कामगिरी करता आलेली नाही.