या श्रीलंकन खेळाडूवर बंदी!

 भारत -श्रीलंका एकदिवसीय क्रिकेट सामन्यांमध्ये षटकांचा वेग कमी ठेवल्याने उपुल थरंगावर दोन सामन्यांची बंदी घालण्यात आली आहे.  

Updated: Aug 26, 2017, 11:04 AM IST
या श्रीलंकन खेळाडूवर बंदी! title=

श्रीलंका :  भारत -श्रीलंका एकदिवसीय क्रिकेट सामन्यांमध्ये षटकांचा वेग कमी ठेवल्याने उपुल थरंगावर दोन सामन्यांची बंदी घालण्यात आली आहे.  

आता श्रीलंकन टीमचे कर्णधारपद  चामरा कपुगेदराकडे सोपावण्यात आले आहे. अलीकडच्या काळात थरंगावर बंदी घालण्याची ही दुसरी घटना आहे. चँपियन्स चषक स्पर्धेतही उपुल थरंगा कर्णधारपद भूषविताना याच कारणास्तव त्याच्यावर बंदी घालण्यात आली होती.

टीममध्ये झाला हा दुसरा बदल 

 सलामीवीर धनुष्का गुणतिलकाच्या खांद्याला दुखापत झाल्याने दिनेस चंडीमलला संधी मिळाली आहे. आगामी दोन्ही सामन्यात गुणतिलका सहभागी होण्याची शक्यता आहे. 
 थरंगाची मैदानावरील कामगिरीही निराशाजनक झाली आहे. भारताविरुद्धच्या तीन कसोटींमधील सहा डावांत त्याला केवळ ८८ धावा करता आल्या आहेत. पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने केवळ ९ व १३ धावा केल्या आहेत.  

    कसा असेल आगामी सामन्यांसाठी श्रीलंकन संघ ? 

 चामरा कपुगेदरा (कर्णधार), दिनेश चंडीमल, लाहिरू थिरीमणा, अँजेलो मॅथ्यूज, निरोशान दिकवेला (विकेटकीपर), दानुष्का गुणतिलका, कुशल मेंडिस, मिलिंदा सिरीवर्दाना, मलिंदा पुष्पकुमार, अकिला दानंजय, लक्षान संदाकन, थिसारा परेरा, वनिंदु हसरंगा, लसित मलिंगा, दुषमंता चामिरा, विश्वा फर्नान्डो.