डेविड वॉर्नर 'या' गोष्टीमुळे आता कधीच ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन होणार नाही

चेंडूशी छेडछाड केल्याप्रकरणी  मुख्य दोषी घोषित झालेला डेविड वॉर्नरवर एक वर्षाची बंदी घालण्यात आली आहे. आता यापुढे ऑस्ट्रेलिया या राष्ट्रीय संघाचे कॅप्टन पद डेविडला कधीच मिळणार नाही. केपटाऊनमध्ये झालेल्या या घटनेची चौकशी केल्यानंतर अशी माहिती समोर आली आहे की, स्टीव स्मिथ आणि कॅमरन बेनक्राफ्टला याबाबत सर्व माहिती होती. आणि डेविड वॉर्नरनेच या पद्धतीने चेंडूच्या माध्यमातून बदल करण्याचा प्रयत्न केला. 

Dakshata Thasale Updated: Mar 29, 2018, 11:41 AM IST
डेविड वॉर्नर 'या' गोष्टीमुळे आता कधीच ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन होणार नाही  title=

सिडनी : चेंडूशी छेडछाड केल्याप्रकरणी  मुख्य दोषी घोषित झालेला डेविड वॉर्नरवर एक वर्षाची बंदी घालण्यात आली आहे. आता यापुढे ऑस्ट्रेलिया या राष्ट्रीय संघाचे कॅप्टन पद डेविडला कधीच मिळणार नाही. केपटाऊनमध्ये झालेल्या या घटनेची चौकशी केल्यानंतर अशी माहिती समोर आली आहे की, स्टीव स्मिथ आणि कॅमरन बेनक्राफ्टला याबाबत सर्व माहिती होती. आणि डेविड वॉर्नरनेच या पद्धतीने चेंडूच्या माध्यमातून बदल करण्याचा प्रयत्न केला. 

त्यामुळे आता स्मिथला पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियाचं कॅप्टन पद मिळणार आहे. मात्र डेविड वॉर्नरच्या नावाचा कधीच विचार केला जाणार नाही. सीए यांनी सांगितले की आंतरराष्ट्रीय आणि स्थानिक क्रिकेट खेळण्यावर आता बंदी लावण्यात आली आहे. त्यामुळे आता कमीत कमी 12 महिने स्टीव स्मिथ आणि बेनक्राफ्ट यांच्या नावाचा कॅप्टन पदासाठी विचार केला जाणार नाही. 

स्मिथला पुन्हा कधीच कॅप्टन पद मिळणार नाही 

ऑस्ट्रेलियाचे माजी कॅप्टन इयान चॅपल असं वलाटतं की, स्टीव स्मिथला यापुढे राष्ट्रीय संघाच कॅप्टन पद कधीच मिळणार नाही. त्यामुळे आता देशाच्या क्रिकेट बोर्डने असा निर्णय घेतला आहे की स्मिथ आणि डेविड वॉर्नर यांना 1 महिन्यांसाठी बंदी केली आहे. त्यांनी म्हटलं की, मी या दोघांना कॅप्टन पदावर कधीच बघू शकत नाही.