Sunil Gavaskar On Fitness: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनल सामन्यात (WTC Final) टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला. ऑस्ट्रेलियाने भारतीय फलंदाजांना संघात टिकू दिलं नाही. सामना पहिल्या दिवसांपासून कांगारूंनी एकतर्फी फिरवला. या सामन्यानंतर टीम इंडियावर (Team India) मोठ्या प्रमाणात टीका झाल्याचं दिसून आलं. रोहित शर्माने (Rohit Sharma) बिझी शेड्युलवर बोट ठेवलं अन् चर्चेतून काढता पाय घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी रोहित शर्माने वर्कलोड मॅनेजमेंटवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. अशातच आता टीम इंडियाचे माजी खेळाडू सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांनी टीम इंडियाच्या फिटनेसवर टीका केली आहे.
रोहित शर्मा कोणत्या तयारीबद्दल बोलतोय? वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचं उदाहरण तुमच्यासमोर आहे. 20 ते 25 दिवस हे काय कारण आहे का? असं म्हणत गावस्करांनी सडकून टीका केली आहे. सध्या जो संघ वेस्ट इंडिजमध्ये खेळायला गेला आहे. तो एक दिवसाच्या तयारीनिशी वेस्ट इंडिजला पराभूत करू शकतो. अशा परिस्थितीमध्ये जेव्हा तुम्ही परिस्थितीविषयी बोलतो, तेव्हा मला आश्चर्य वाटतं, असं गावस्कर म्हणतात.
तुम्ही 15 दिवस अगोदर जा दौऱ्यावर जा, तिथं तुम्ही सराव सामने खेळा. तुमच्या मुख्य खेळाडूंना विश्रांती दिली जाऊ शकते परंतु राखीव खेळाडूंना संधी देणं गरजेचं आहे. राखीव खेळाडूंना स्वत:ला सिद्ध करण्याची संधी कधी मिळत नाही, असं म्हणत गावस्करांनी मॅनेंजमेंटवर ताशेरे ओढले आहेत. टी-ट्वेंटी फॉरमॅटमध्ये तुम्हाला वर्कलोडची समस्या कशी असू शकते? असा सवाल देखील गावस्करांनी उपस्थित केला आहे.
तुम्ही जर टी-ट्वेंटी क्रिकेटमध्ये थकत असाल तर तुम्ही वनडे आणि कसोटी सामने कसे खेळणार आहात. टी-ट्वेंटीमध्ये 4 आणि 5 तासात तुम्ही थकत असाल तर तुमच्या फिटनेसवर (Sunil Gavaskar On Fitness) प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ शकतं. रोटेशन पॉलिसीनुसार वर्कलोड या सर्व पराभवानंतर सांगायची कारणे आहेत.. बाकी काही नाही, असं गावस्कर म्हणाले आहेत.
आणखी वाचा - 'मला खुप राग आला, RCB साठी 8 वर्ष खेळलो पण...', चहलने स्पष्टपणे जाहीर केली नाराजी!
दरम्यान, टीम इंडियाच्या फिटनेसवर टीका करताना गावस्करांनी यावेळी कपिल देव यांचं उदाहरण दिलं. कपिल देव कधी जीममध्ये गेल्याचं मला आठवत नाही. तो जमिनीवर धावायचा. तुम्ही जीममध्ये न जाता फिट राहू शकता, असंही गावस्कर म्हणाले आहेत.