क्रिकेटमध्ये पुढे जावू नये यासाठी सीनिअर्सने हॉकी स्टिकने मारलं, स्पोर्टस होस्टेलला रँगिंग, पण टीम इंडियात धडकलाच

रॅगिंगला वैतागून रैनानं सोडलं होतं कॉलेज, आईला सांगितलं वेगळंच कारण

Updated: May 8, 2021, 08:20 PM IST
क्रिकेटमध्ये पुढे जावू नये यासाठी सीनिअर्सने हॉकी स्टिकने मारलं, स्पोर्टस होस्टेलला रँगिंग, पण टीम इंडियात धडकलाच  title=

मुंबई: भारतीय संघाचा माजी खेळाडू आणि चेन्नईचा स्टार प्लेअर सुरेश रैनाने महेंद्र सिंह धोनीसोबत आंतरराष्ट्रीय क्रिकेट निवृत्ती जाहीर केली होती. महेंद्रसिंह धोनी आणि सुरेश रैना यांचं नातंच मैदानापासून ते मैदानाबाहेर मैत्रीचं नातं सर्वांनाच परिचयाचं आहे. रैनाचा आजपर्यंतचा प्रवास खूप संघर्षमयी होता.

कॉलेज असो किंवा शाळा प्रत्येकाच्या आयुष्यात असा एक क्षण येतो की जिथे आपणं खूप वैतागतो किंवा जमत नाही किंवा झेपत नाही अशी फेज येते. असंही काहीसं रैनाच्याही आयुष्यात घडलं  होतं. सुरेश रैना लखनऊच्या गुरू गोविंदसिंह स्पोर्ट्स कॉलेज आणि स्पोर्ट्स हॉस्टेल लखनऊ इथे राहात होते. त्यावेळी त्यांच्या आयुष्यात एक किस्सा घडला होता जो त्यांनी एक मुलाखतीमध्ये सांगितला होता.

एका मुलाखतीदरम्यान रैनानं सांगितलं होतं की तो कॉलेजमध्ये असताना रॅगिंगला खूप वैतागला होता. त्या त्रासाला कंटाळून तो कॉलेजमधून घरी परतला. ज्यावेळी त्याला आईने विचारलं की पुन्हा घरी का आलास त्यावेळी रैनानं दिवाळीची सुट्टी असल्याचं कारण पुढे केलं होतं. 

रैनाला अशा प्रसंगांमुळे पुन्हा लखनऊमधील कॉलेज आणि हॉस्टेलमध्ये जाण्याची अजिबात इच्छा नव्हती. जसे जसे दिवस जवळ येतील तसे रैनाची धाकधूक वाढत होती. तो त्रास नकोसा वाटत होता. आईलाही शंका आली आणि अखेर 4 महिन्यांनी रैनाने आईला खरं कारणं सांगितलं. त्यावेळी आईने मला खूप समजवलं. कुटुंबाची परिस्थिती आणि आईनं दिलेला आधार यामुळे मी पुन्हा कॉलेजमध्ये जाण्याचा निश्चय केला.

मात्र पुन्हा एकदा रैनासोबत विचित्र प्रकार घडला. सुरेश रैनाला स्पोर्ट हॉस्टेलमध्ये देखील रॅगिंग दरम्यान हॉकी स्टीकने देखील खूप मारहाण करण्यात आली होती. त्याच्या सीनियर खेळाडूंना तो आपल्या पुढे जाईल याची भीती होती त्यामुळे असा प्रकार केल्याचं रैनाला नंतर कळलं. हा घटनेनंतर रैनानं हॉस्टेल सोडण्याचा निर्णय घेतला.