मदतीसाठी पुढे आला सुरेश रैना, कोरोनाशी लढण्यासाठी ५२ लाखांची मदत

भारताचा क्रिकेटर सुरेश रैना (Suresh Raina)हा देखील मदतीसाठी पुढे आला आहे.

Updated: Mar 29, 2020, 07:49 AM IST
मदतीसाठी पुढे आला सुरेश रैना, कोरोनाशी लढण्यासाठी ५२ लाखांची मदत

मुंबई : कोरोना व्हायरस (Coronavirus) जगात धुमाकूळ घालत असताना त्याच्या विरोधात सगळ्याच देशांनी युद्ध पुकारलं आहे. कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी आर्थिक मदतीचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. त्यानंतर जण मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. भारताचा क्रिकेटर सुरेश रैना (Suresh Raina)हा देखील मदतीसाठी पुढे आला आहे. त्याने शनिवारी ५२ लाखांची मदत केली आहे. ज्यामध्ये ३१ लाख रुपये पंतप्रधान केअर फंड आणि २१ लाख उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये दिले आहेत.

ट्विटरवर सुरेश रैनाने म्हटलं की, "आपल्या सगळ्यांना कोरोनाला पराभूत करण्यासाठी मदत करायची आहे. कोरोनाच्या विरोधात लढाईसाठी मी ५२ लाख (पीएम केअर्स फंडसाठी ३१ लाख आणि यूपी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये २१ लाख) मदत देत आहे. कृपया तु्म्ही देखील सहकार्य करा." रैनाच्या ट्विटला रिट्विट करत पंतप्रधान मोदींनी 'शानदार फिफ्टी' असं म्हटलं आहे.

भारताचा दिग्गज क्रिकेटर सचिन तेंडुलकरने याआधी ५० लाखांची मदत केली आहे. पंतप्रधान मोदींनी कोरोनाशी सामना करण्यासाठी मदत करण्याचं आवाहन केलं आहे. त्यांनी यासाठी पीएम केअर्स फंडचा अकाऊंट नंबर देखील शेअर केला आहे.