शुभमन गिल याचा आयपीएल 2023 मध्ये आणखी एक मोठा विक्रम, असा झाला मालामाल

IPL 2023 CSK vs GT Final: आयपीएल 2023 चे विजेतेपद जिंकणाऱ्या चेन्नई सुपर किंग्स संघाला कोट्यवधी रुपयांची बक्षीस रक्कम देण्यात आली. त्याचबरोबर अंतिम सामना हरणारा संघ गुजरात टायटन्सही श्रीमंत झाला आहे. मात्र, शुभमन गिल याने जोरदार कमाई केली आहे. तो चांगलाच मालामाल झालाय.

सुरेंद्र गांगण | Updated: May 30, 2023, 10:35 AM IST
शुभमन गिल याचा आयपीएल 2023 मध्ये आणखी एक मोठा विक्रम, असा झाला मालामाल title=

Shubman Gill Most Four in IPL Records : इंडियन प्रीमियर लीग 2023 च्या चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यातील अंतिम सामन्यात शुभमन गिल याने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केलाय. गुजरातकडून सलामीला आलेल्या शुभमन गिल याने काही धावा करताच मोठा विक्रम केला. या बाबतीत त्याने अनेक दिग्गज खेळाडूंना मागे टाकले. शिवाय त्याने विराट कोहली याचा मोठा विक्रमही मोडीत काढला आहे. तसेच ऑरेंज कॅप, गेम चेंजर ऑफ द सीजन, सर्वात मौल्यवान खेळाडू ठरला असताना एका मोसमात सर्वाधिक चौकार मारण्याचा विक्रम आपल्याच नावावर केला आहे. यासाठी त्याला प्रत्येकी 10 लाख रुपये मिळाले आहेत.

39 धावा करणाऱ्या शुभमन गिल हा आयपीएलच्या एका मोसमात सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज ठरला आहे. दरम्यान, विराट कोहली आघाडीवर आहे. त्याने 2016 च्या आयपीएलमध्ये 973 धावा केल्या होत्या, तर गिलने चालू हंगामात 890 धावा केल्या होत्या. गिलने या सामन्यात जोस बटलरचा 863 धावांचा विक्रम मोडला. तसेच विराट कोहलीचाही मोठा विक्रम मोडीत काढत गिल नंबर-1 बनला. खरे तर, गिलने एका मोसमात फिरकी गोलंदाजांविरुद्ध सर्वाधिक धावा करण्याचा कोहलीचा विक्रम मोडला आहे. कोहलीने 2016 च्या आयपीएलमध्ये फिरकी गोलंदाजांविरुद्ध 364 धावा केल्या होत्या. विराटचा हा विक्रम आता शुभमन गिलने मोडला आहे. या सामन्यात फिरकी गोलंदाजांविरुद्ध त्याने 40 धावा करताच हा विक्रम आपल्या नावावर केला. गिलने या मोसमात फिरकी गोलंदाजांविरुद्ध 378 धावा केल्या आहेत.

IPL 2023 Prize Money: इंडियन प्रीमियर लीग 2023चा (IPL 2023)  अंतिम सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स (CSK vs GT) यांच्यात खेळला गेला. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने गुजरात टायटन्सचा डीएलएस नियमानुसार 5 विकेटने पराभव करुन विजेतेपद पटकावले. फायनल जिंकल्यानंतर चेन्नई सुपर किंग्सला केवळ चमकदार ट्रॉफीच मिळाली नाही तर कोट्यवधी रुपयांची बक्षीस रक्कमही मिळाली. त्याचवेळी गुजरात टायटन्सला हरल्यानंतरही बक्षिसाची मोठी रक्कम देण्यात आली.

अंतिम सामना जिंकताच चेन्नई सुपर किंग्स श्रीमंत 

IPL 2023 चा अंतिम सामना जिंकल्यानंतर चेन्नई सुपर किंग्जला 20 कोटी रुपयांची बक्षीस रक्कम (IPL 2023 प्राइज मनी) देण्यात आली. जगभरात खेळल्या जाणाऱ्या विविध T20 लीगमध्ये ही सर्वाधिक आहे. अंतिम फेरीत पराभूत झालेल्या गुजरात टायटन्सला 12.5 कोटी रुपये देण्यात आले. तिसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या मुंबई इंडियन्सच्या संघाला 7 कोटी आणि चौथ्या क्रमांकावर असलेल्या लखनऊ सुपर जायंट्सच्या संघाला 6.5 कोटी देण्यात आले.

आयपीएल इतर लीगपेक्षा खूप पुढे  

जगभरात खेळल्या जाणार्‍या वेगवेगळ्या T20 लीगमध्ये इतकी बक्षीस रक्कम दिली जात नाही. इंडियन प्रीमियर लीग (IPL) नंतर SA20 लीगमध्ये सर्वाधिक बक्षीस रक्कम दिली जाते. दक्षिण आफ्रिका T20 लीग जिंकणाऱ्या संघाला 15 कोटी रुपये दिले जातात. त्याचवेळी, कॅरेबियन प्रीमियर लीग (CPL) विजेतेपद जिंकणाऱ्या संघाला 8.14 कोटी रुपये दिले जातात. याशिवाय पाकिस्तान सुपर लीगमधील ही रक्कम केवळ 3.40 कोटी रुपये आहे.

कोणत्या कॅटेगरीत कोणाला किती बक्षीस मिळाले?

वर्षातील उदयोन्मुख खेळाडू यशस्वी जायसवाल 10 लाख रुपये
पर्पल कॅप मोहम्मद शमी 10 लाख रुपये
ऑरेंज कॅप शुभमन गिल 10 लाख रुपये
एका मोसमात सर्वाधिक षटकार फाफ डुप्लेसी 10 लाख रुपये
गेम चेंजर ऑफ द सीजन शुभमन गिल 10 लाख रुपये
सर्वात मौल्यवान खेळाडू शुभमन गिल 10 लाख रुपये
लॉन्गेस्ट सिक्स ऑफ द सीजन फाफ डुप्लेसी 10 लाख रुपये
कैच ऑफ द सीजन राशिद खान 10 लाख रुपये
पेटीएम फेयरप्ले अवॉर्ड दिल्ली कॅपिटल्स -
बेस्ट पिच एंड ग्राउंड ऑफ द सीजन वानखेड़े-ईडन गार्डन 50 लाख रुपये
हंगामातील सुपर स्ट्रायकर ग्लेन मॅक्सवेल 10 लाख रुपये
एका मोसमात सर्वाधिक चौकार शुभमन गिल 10 लाख रुपये