मुंबईच्या सूर्यकुमार यादवने आपल्या नावे केला हा मोठा रेकॉर्ड

एकही आंतरराष्ट्रीय सामना न खेळलेला खेळाडू करतोय शानदार कामगिरी

शैलेश मुसळे | Updated: May 14, 2018, 11:09 AM IST
मुंबईच्या सूर्यकुमार यादवने आपल्या नावे केला हा मोठा रेकॉर्ड title=

मुंबई : आयपीएलमध्ये मुंबईकडून ओपनिंग करणारा सूर्यकुमार यादव यंदाच्या सीजनमध्ये चांगली कामगिरी करतो आहे. आयपीएलमध्ये अनकॅप्ड प्लेयर्स (ज्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देशाचं प्रतिनिधित्व नाही केलं.) बाबत बोलायचं झालं तर सूर्यकुमार यादवने एक मोठा रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे. अनकॅप्ड प्लेयर म्हणून सर्वाधिक रन करण्याचा रेकॉर्ड सूर्यकुमार यादवने आपल्या नावे केला आहे. सूर्यकुमारने आतापर्यंत १०११ रन्स बनविले आहेत. १००४ रन्स करणाऱ्या मनन वोहराला त्याने मागे टाकले आहे.

IPL मधील अनकॅप्ड प्लेयर्स, ज्यांनी सर्वाधिक रन केले

466 सूर्यकुमार यादव 

463 पी वॉलथाटी

439 श्रेयस अय्यर

432 मनदीप सिंह

419 सौरभ तिवारी

401 मनीष पांडे 

यंदाच्या आयपीएलमध्ये सूर्यकुमार यादवने सर्वाधिक रन बनवणाऱ्य़ांच्या यादीत सहाव्या स्थानी आहे. 27 वर्षाचा सूर्यकुमार यंदा मुंबईकडून खेळतो आगे. त्यासा मुंबईने 3.20 कोटींना खरेदी केलं आहे. 2010 मध्ये मुंबईकडून फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये त्याने डेब्यू केलं आहे.