Rohit Sharma : आयपीएल 2023 ( IPL 2023 ) आता शेवटच्या टप्प्यात आली आहे. यावेळी मुंबई इंडियन्सचे ( Mumbai Indians ) चाहते सध्या फार खूश आहेत. रॉयल चॅलेंजर बंगळूरूच्या ( Royal Challengers Bangalore ) पराभवामुळे मुंबईला प्लेऑफमध्ये स्थान मिळालं. यावेळी प्लेऑफमध्ये मुंबईचा सामना लखनऊ सुपर जाएंट्ससोबत ( Lucknow Super Giants ) होणार आहे. अशातच मुंबई इंडियन्सच्या टीमचा एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसतोय. यामध्ये मुंबई इंडियन्सचा ( Mumbai Indians ) कर्णधार रोहित शर्मासह इतर खेळाडू गाणं म्हणताना दिसतायत.
मुंबईच्या ( Mumbai Indians ) टीमला प्लेऑफमध्ये स्थान मिळाल्यामुळे मुंबईची टीम काही प्रमाणात खूश असल्याचं दिसून येतंय. प्लेऑफमध्ये स्थान मिळवणारी मुंबई ही चौथी टीम ठरली आहे. याचवेळी मुंबईच्या खेळाडूंचा एक व्हिडीओ समोर आलाय. यामध्ये कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma ) , सूर्यकुमार यादव ( Suryakunar yadav ) आणि इतर खेळाडू, सैंय्या हे गाणं म्हणतातय.
मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने ( Rohit Sharma ) त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला. या शेअर केलेल्या व्हिडीयला रोहितने कॅप्शन दिलंय की, मुंबई येऊ शकत नाही. दरम्यान चाहत्यांना हा व्हिडीओ प्रचंड आवडला असून खास रोहितचं गाणं त्यांना भावलंय.
या व्हिडीओमध्ये रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव ( Suryakunar yadav ) , नेहल वढेरा हे खेळाडू इन्स्टावर व्हायरल होणाऱ्या एका रीलला फॉलो करताना दिसतायत. यावेळी एक-एक खेळाडू गात असताना त्याचे सूर ऐकून स्वतःचं हसू रोखू शकत नाहीत. या व्हिडीओमध्ये खेळाडू एकमेकांशी मस्करी करताना दिसतायत.
मुंबई सहाव्यांदा आयपीएल जिंकण्यासाठी अजून केवळ 3 पावलं दूर आहे. प्लेऑफमध्ये मुंबईचा सामना पॉईंट्स टेबलवर असलेल्या तिसऱ्या स्थानावर असलेल्या लखनऊ सुपर जाएंट्स सोबत होणार आहे. यासाठी रोहित सेना तयार आहे की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
लखनऊ सुपर जायंट्स – क्विंटन डीकॉक (विकेटकीपर), करण शर्मा, प्रेरक मांकड़, मार्कस स्टॉयनिस, निकोलस पूरन, क्रुणाल पांड्या (कर्णधार), आयुष बडोनी, कृष्णप्पा गौतम, नवीन-उल-हक, रवि बिश्नोई, मोहसिन खान
मुंबई इंडियन्स - रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), कॅमरून ग्रीन, सूर्यकुमार यादव, टीम डेविड, नेहल वढेरा, क्रिस जॉर्डन, पीयूष चावला, जेसन बेहरेनडॉर्फ, कुमार कार्तिकेय, आकाश मधवाल