NZ vs AFG | Rashid Khan ची ऐतिहासिक कामगिरी, टी 20 मध्ये असा कारनामा करणारा चौथा गोलंदाज

अफगाणिस्तानचा न्यूझीलंड विरुद्ध पराभव झाला असला तरी स्टार फिरकीपटू राशिद खानने (Rashid Khan) ऐतिहासिक कामगिरी केली आहे.

Updated: Nov 7, 2021, 08:52 PM IST
NZ vs AFG | Rashid Khan ची ऐतिहासिक कामगिरी, टी 20 मध्ये असा कारनामा करणारा चौथा गोलंदाज title=

अबूधाबी : आयसीसी टी 20 वर्ल्ड कपमधील (ICC T 20 World Cup 2021) 40 व्या सामना न्यूझीलंड विरुद्ध अफगाणिस्तान (New Zealand vs Afghanistan) यांच्यात खेळवण्यात आला. या सामन्यात न्यूझीलंडने अफगाणिस्तानवर 8 विकेट्सने मात केली. न्यूझीलंडने या विजयासह सेमी फायनलमध्ये धडक मारली. या सामन्यात अफगाणिस्तानचा पराभव झाला असला तरी स्टार फिरकीपटू राशिद खानने (Rashid Khan) ऐतिहासिक कामगिरी केली आहे. राशिद अशी कामगिरी करणारा टी 20 क्रिकेटमधला एकूण चौथा गोलंदाज ठरला आहे. (T 20 world cup 2021 New Zeland vs Afghanistan Spinner Rashid Khan become 4th bolwer whi take 400 wickets in t 20 cricket)

राशिदने नक्की काय केलंय?

राशिदने टी 20 क्रिकेटमध्ये 400 विकेट्सचा टप्पा पूर्ण केला आहे. राशिदने न्यूझीलंडचा सलामवीर मार्टिन गुप्टीलला 28 धावांवर बोल्ड केलं. यासह राशिदने टी 20 क्रिकेटमधील 400 वी विकेट पूर्ण केली. राशिदच्या आधी 400 विकेट्स घेण्याचा किर्तीमान 3 गोलंदाजांनीच केला आहे.

ड्वेन ब्राव्हो -  553 विकेट्स

सुनील नरेन - 425 विकेट्स

इमरान ताहीर - 420 विकेट्स

राशिद खान - 400  विकेट्स

न्यूझीलंडची सेमी फायनलमध्ये धडक 

दरम्यान अफगाणिस्तानचा पराभव केल्याने न्यूझीलंडने टी 20 वर्ल्ड कप जिंकण्याच्या हेतूने एक पाऊल पुढे टाकलं आहे. तर अफगाणिस्तानच्या पराभवामुळे टीम इंडियाचं जर तरचं आव्हान संपुष्टात आलं आहे. त्यामुळे आता साखळी फेरीतील सामन्यानंतर बाद फेरीतील सामन्यांसाठी क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे.