मुंबई: आशिया कपची (Asia Cup 2022) सांगता झाल्यानंतर आता क्रिकेटप्रेमी आता 16 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या T20 World Cup च्या प्रतिक्षेत आहेत. आगामी T20 World Cup साठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. निवड समितीने भारतीय संघाची घोषणा करताना 3 मोठे निर्णय घेतले. त्यामुळे सिलेक्टर्सवर सोशल मीडियावर टीका होताना दिसत आहे.
1. रवि बिश्नोईच्या जागी आश्विनचं सिलेक्शन
T20 World Cupचं ऑस्ट्रेलियात आयोजन करण्यात आलंय. रविचंद्रन आश्विनची ऑस्ट्रेलियामधील कामगिरी फारशी चांगली नाही. भारताच्या अनुभवी स्पिनर्समध्ये आश्विनचा समावेश होतो. मात्र आतापर्यंत आश्विनसाठी ऑस्ट्रेलियन खेळपट्ट्या अनुकूल राहिल्या नाहीत. रवी बिश्नोई या लेग स्पिनरमध्ये ऑस्ट्रेलियात प्रभावी ठरु शकतो. मात्र, आश्विनच्या अनुभवाला सिलेक्टर्सने प्राधान्य दिल्याचं पहायला मिळालं.
2. KL Rahul ला संधी
टीम इंडियाचा ओपनर के एल राहुलने (K L Rahul) आशिया कपमध्ये निराशाजनक कामिगरी केली. मात्र त्यानंतरही त्याचा वर्ल्ड कप स्कॅवडमध्ये समावेश करण्यात आला. राहुल वर्ल्ड कपमध्येही ओपनरची भूमिका बजावणार आहे. त्यामुळे त्याच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असणार आहे. सोबतच टीम इंडियाला चांगली सुरुवात मिळवून देण्याचं आव्हान त्याच्यासमोर असणार आहे. सोबतच राहुल उपकर्णधारही आहे. त्यामुळे या दोन्ही आघाड्यांवर केएलकडून T20 World Cup मध्ये जबरदस्त कामगिरीची अपेक्षा असेल.
3. सॅमसनला डच्चू अन् पंतला संधी
रिषभ पंतवर टीम इंडियाच्या मीडल ऑर्डरची जबाबदारी आहे. पंत त्याच्या आक्रमक आणि स्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जातो. मात्र रिषभला अजूनही हवी तशी खेळी करता आलेली नाही. त्याला आपल्या कामगिरीत सातत्य राखण्यात अपयश येतंय. पंतने आशिया कपमध्ये अनेकदा चुकीचे शॉर्ट्स खेळून विकेट गमावलीय. त्यामुळे पंतला मुख्य संघात संधी मिळेल का, असा प्रश्न सर्वांनाच पडला होता. तर दुसरीकडे राजस्थान रॉयल्सचं कर्णधारपद सांभाळणाऱ्या संजू सॅमसनला संधी मिळेल, अशी शक्यता वर्तविली जात होती. मात्र, सिलेक्टर्सने अखेर पंतला संधी दिली.
कुंबळेंचा पत्ता कट, 1 वर्ल्ड कप, IPL च्या 2 ट्रॉफी जिंकून देणारा प्रशिक्षक पंजाबच्या 'हेडकोच'पदी!
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, आर अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग.