ख्रिस गेल पेक्षा तुफान फलंदाजी, या खेळाडूने २८ चेंडूत ठोकले शतक

क्रिकेट लीग मर्यादित सषटकांच्या स्पर्धेत या क्रिकेटपटूने वादळी खेळी केली.  

सुरेंद्र गांगण | Updated: Aug 1, 2019, 04:12 PM IST
ख्रिस गेल पेक्षा तुफान फलंदाजी, या खेळाडूने २८ चेंडूत ठोकले शतक title=
Pic Courtesy : @EuropeanCricket

लंडन : काही दिवसांपूर्वी ग्लोबल टी - २० कॅनडा लीगमध्ये ख्रिस गेले याने वादळी फटकेबाजी करत केवळ ५४ चेंडूत १२२ धावांची शानदार खेळी करत शतक ठोकले. मात्र, युरोप क्रिकेट लीग मर्यादित सषटकांच्या स्पर्धेत अहमद नबी या क्रिकेटपटूने वादळी खेळी केली. त्याने केवळ २८ चेंडूत शतक ठोकून नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. ख्रिस गेलने २०१३मध्ये आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून खेळताना पुणे वॉरिअर्स विरुद्ध ३० चेंडूत शतक ठोकले होते.

ख्रिस गेलचे पुन्हा वादळ । १२ षटकार आणि ७ चौकार

युरोपमध्ये सध्या टी-१० स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत अहमद नबी या खेळाडून आपल्या तुफान फटकेबाजीने सर्वांची मने जिंकली. त्याची ही स्फोटक खेळी ख्रिस गेलपेक्षा तुफान होती. दरम्यान, १० षटकांच्या क्रिकेटला आयसीसीची अधिकृत मान्यता मिळालेली नसली तरी नबीने केलेली कामगिरी नक्कीच कौतुकास्पद आहे. मान्यताप्राप्त क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतक ठोकण्याचा विक्रम सध्या वेस्ट इंडिजचा धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेल याच्याच नावावर आहे.

नबीच्या शतकी खेळीच्या जोरावर ड्रेक्स क्रिकेट क्लबला १० षटकांमध्ये ६ बळींच्या मोबदल्यात १६४ धावांचा डोंगर उभारला. १० षटकांमधली ५ षटके तर फक्त अहमद नबीनेच फलंदाजी केली. नबीने ३० चेंडूत नाबाद १०५ धावांची खेळी केली. प्रत्युत्तरात क्लज क्रिकेट क्लबने १० षटकांमध्ये ५ विकेटच्या मोबदल्यात केवळ ६९ धावा केल्या. ड्रेक्स क्रिकेट क्लबने हा सामना ९५ धावांनी जिंकला.