IND vs NZ | टीम इंडियाच्या पराभवावर इंझमाम काय म्हणाला?

पाकिस्तानचा माजी कर्णधार इंझमाम उल हकने (Inzamam Ul Haq) या सामन्यानंतर प्रतिक्रिया दिली आहे.

Updated: Nov 1, 2021, 06:47 PM IST
IND vs NZ | टीम इंडियाच्या पराभवावर इंझमाम काय म्हणाला? title=

मुंबई : न्यूझीलंड (NewZeland) विरुद्ध झालेल्या लाजीरवणाऱ्या पराभवानंतर टीम इंडियावर (Team India) सडकून टीका केली जात आहे. या सलग दुसऱ्या पराभवामुळे टीम इंडियाचं सेमी फायनलमधील (Semi Final) आव्हानही कठीण झालंय. या सामन्यानंतर माजी खेळाडू आपली बाजू मांडत आहेत. पाकिस्तानचा माजी कर्णधार इंझमाम उल हकने (Inzamam Ul Haq) या सामन्यानंतर प्रतिक्रिया दिली आहे. इंझमामने टीम इंडियाच्या या पराभवावर हैराणी व्यक्त केली. (T20 World Cup 2021 india vs nz pakistan former captain Inzamam Ul Haq give reaction on team india loss)

इंझमाम काय म्हणाला?

टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील सामना हा या स्पर्धेतील मोठ्या सामन्यांपैकी एक होता. टीम इंडियाने या सामन्यात इतकी निराशाजनक कामगिरी का केली हे समजू शकलेलं नाही. "'टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान यानंतरचा हा सर्वात मोठा सामना होता. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यापेक्षाही मोठा सामना होता. ज्या पद्धतीने टीम इंडिया खेळली त्यामुळे मला धक्का बसला", असं इंझमाम म्हणाला. इंझमाम त्याच्या यूट्युब चॅनेलवर बोलत होता.

विराट स्पिन चांगली खेळतो पण....

"न्यूझीलंडचे फिरकीपटू चांगले आहेत. पण ते जागतिक ख्यातीचे गोलंदाज नाहीत. टीम इंडियाच्या फलंदाजांना या फिरकी गोलंदाजांच्या बॉलिंगवर सिंगलही घेता येत नव्हते. विराट कोहली उत्तमरित्या स्पिन खेळतो. पण त्यालाही या सामन्यात स्ट्राईक बदलता आलं नाही", असंही इंझमामने नमूद केलं.