'पाकिस्तानसाठी टी 20 वर्ल्ड कप घरातील स्पर्धेसारखं, तुम्ही सावध राहा', या खेळाडूचा टीम इंडियाला इशारा

T20 World Cup | 'सावध राहा! आमच्या घरात टी 20 वर्ल्ड कपचं आयोजन', पाकिस्तानच्या खेळाडूचा भारताला इशारा  

Updated: Aug 18, 2021, 11:07 PM IST
'पाकिस्तानसाठी टी 20 वर्ल्ड कप घरातील स्पर्धेसारखं, तुम्ही सावध राहा', या खेळाडूचा टीम इंडियाला इशारा title=
प्रातिनिधिक फोटो

मुंबई: इंग्लंड विरुद्ध 5 कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. त्यानंतर आयपीएल आणि त्यानंतर UAEमध्ये टी 20 सामन्यांचं आयोजन करण्यात आलं आहे. टीम इंडियाच्या हातून वर्ल्ड चॅम्पियनशिपची ट्रॉफी गेल्यानंतर आता टी 20 कडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. टी 20 वर्ल्ड कपमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान सामना देखील होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर पाकिस्तानच्या खेळडूने टीम इंडियाला इशारा दिला आहे. 

आयसीसीशी बोलताना पाकिस्तान टीमचा कॅप्टन बाबर आझम म्हणाला की ही स्पर्धा UAEमध्ये आयोजित करण्यात आली आहे. UAE हे आम्हाला अगदीच घरच्या सामन्यासारखं आहे. पाकिस्तानचा संघ UAEच्या मैदानावर अनेक सामने खेळला आहे. त्यामुळे UAEच्या मैदानाची अगदी बारकाईनं माहिती पाकिस्तानच्या खेळाडूंना आहे. 

याचाच फायदा पाकिस्तानचा संघ घेऊ शकतो. बाबर आझमने टीम इंडियाला इशारा दिला आहे. टीम इंडियाला पाकिस्तानच्या टीम विरुद्ध खेळण्यासाठी विशेष तयारी करावी लागेल असंही त्याने म्हटलं आहे. टी 20 वर्ल्ड कपचा रेकॉर्ड जरी पाकिस्तानच्या फेवरमध्ये नसला तरी त्यांचा कॉन्फीडन्स जबरदस्त असल्याचं दिसत आहे. 

पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम म्हणाला की, "पाकिस्तानसाठी टी -20 विश्वचषक हा घरगुती स्पर्धेसारखा आहे. याचं कारण म्हणजे पाकिस्तानची टीम यूएईमध्ये अनेक सामने खेळली आहे. आम्ही या दरम्यान केवळ चांगले खेळलो नाही, तर अव्वल संघांना पराभूत करून रँकिंगच्या शीर्षस्थानीही पोहोचलो. तो म्हणाला की सर्व खेळाडू उत्साही आहेत.