टीम इंडियाच्या 3 खेळाडूंकडून लवकरच गूड न्यूज मिळण्याची शक्यता

कोण आहेत टीम इंडियाचे तीन धुरंधर खेळाडू? काय असू शकते गूड न्यूज य़ाची उत्सुकता सर्वांनाच आहे

Updated: Jul 7, 2021, 09:28 PM IST
टीम इंडियाच्या 3 खेळाडूंकडून लवकरच गूड न्यूज मिळण्याची शक्यता

मुंबई: क्रिकेट विश्वात आणि चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. एकीकडे टीम A इंग्लंड दौऱ्यावर तर दुसरीकडे B टीम श्रीलंका दौऱ्याची तयारी करण्यात व्यस्त आहे. यासोबतच टीम इंडियातील 3 खेळाडू लवकरच गूड न्यूज देण्याची शक्यता आहे. गूड न्यूज म्हणजे तुम्ही विचार केला ती नाही तर लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याची चर्चा आहे. 

या यादीमध्ये टीम इंडियाचे तीन युवा खेऴाडू आहेत. त्यांच्या रिलेशनशिपची सोशल मीडियावर चर्चा होतीच पण लवकरच आता हे तिन्ही खेळाडू लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याची माहिती मिळत आहे. यासंदर्भात अद्याप तारीख किंवा इतर कोणती माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. पण हे तीन खेळाडू आहेत कोण ते जाणून घेऊया.

ऋषभ पंत

टीम इंडियाचा युवा फलंदाज आणि विकेटकीपर ऋषभ पंत आपल्या गर्लफ्रेंड ईशा नेगीसोबतच्या नात्याबाबत बर्‍याचदा चर्चेत आला आहे. ईशा देहरादूनची असून ती इंटिरियर डिझायनर आहे. पंतसोबत ती रिलेशनमध्ये असल्याचं कळल्यानंतर सोशल मीडियावर ईशाचे फॉलोअर्स वाढले आहेत. ईशा नेगी इंस्टाग्रामवर खूप अ‍ॅक्टिव्ह आहे. पंतने काही काळापूर्वी आपली गर्लफ्रेंड ईशा नेगीसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. ऋषभ पंत आणि ईशा नेगी लवकरच लग्न करणार असल्याची चर्चा आहे. 

के एल राहुल 

भारताचा स्टार विकेटकीपर-फलंदाज केएल राहुल गेल्या काही काळापासून उत्तम फॉर्ममध्ये आहे. वन डे आणि टी -20 क्रिकेटमध्ये राहुलने आपली उत्तम कामगिरी केल्यानं टीम इंडियाला जिंकण्यासाठी मदत झाली. केएल राहुलच्या लव्ह लाइफविषयी बोलताना तो बॉलीवूडचा दिग्गज दिग्दर्शक सुनील शेट्टीची मुलगी अथिया शेट्टीशी डेट करत आहे. 

राहुल अथियासोबतचे फोटो बर्‍याचदा सोशल मीडियावर शेअर करतो. हे दोघंही आपल्या रिलेशनशिपवर उघडपणे बोलत नसले तरी त्यांचे फोटो सोशल मीडियावर चर्चेत असतात. अशी शक्यता वर्तविली जात आहे की हे दोघे लवकरच गाठ बांधू शकतात.

ईशान किशन

मुंबई इंडियन्सचा फलंदाज आणि भारतीय क्रिकेटपटू इशान किशन गर्लफ्रेंड अदिति हुंडियासोबत रिलेशनशिपमध्ये आहेत. अदिती प्रोफेशननुसार मॉडेल असून तिने मिस इंडिया 2017 मध्ये भाग घेतला होता. तिने मिस इंडिया राजस्थानचा मुकूटही आपल्या नावावर केला. 

आदितीने ईशान किशनसोबतचे फोटो सोशल मीडियावर अनेकवेळा शेअर केले आहेत. ईशान किशनची मैत्रीणही विराट कोहली आणि एमएस धोनीची मोठी फॅन आहे. तिला क्रिकेट खूप आवडते. ईशान किशन लवकरच अदितीसोबत बोहल्यावर चढणार असल्याची चर्चा आहे.