Ravindra Jadejaन डिलीट केल्या CKSच्या सगळ्या पोस्ट, नक्की काय बिनसलं?

पुढच्या वर्षी जडेजा कोणत्या टीममधून खेळणार तुम्हाला काय वाटतं?

Updated: Jul 9, 2022, 05:41 PM IST
Ravindra Jadejaन डिलीट केल्या CKSच्या सगळ्या पोस्ट, नक्की काय बिनसलं?  title=

मुंबई : चेन्नई सुपर किंग्जच्या चाहत्यांसाठी सर्वांत मोठी बातमी समोर आली आहे. टीम इंडियाचा ऑलराऊंडर रवींद्र जडेजाने चेन्नई सुपर किंग्ज संबंधित सर्वंच पोस्ट इन्टाग्रामवरून काढून टाकल्या आहेत. त्यामुळे जडेजा आणि चेन्नईमधला वाद इतका टोकाला गेलाय का? ज्यामुळे जडेजाने चेन्नईचे सर्व पोस्ट हटवल्या आहेत, अशी चर्चा सुरु आहे. त्याचसोबत आता जडेजा पुढच्या वर्षी कोणत्या संघाकडून आयपीएल खेळणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 

महेंद्रसिंह धोनीने चेन्नईच्या कर्णधार पदाचा राजीनामा दिला होता. या राजीनाम्यानंतर यंदाच्या आयपीएल हंगामात चेन्नईची धुरा रवींद्र जडेजाकडे सोपवण्यात आली होती. त्यामुळे चेन्नई जडेजाच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरली होती. मात्र जडेजाच्या नेतृत्वाखाली संघाला चांगली कामगिरी करता आली नव्हती. एका मागून एक सामने चेन्नई गमावत होती. जडेजाच्या नेतृत्वात 8 मधून 2 सामनेच जिंकण्यात संघाला यश आले होते. 

आय़पीएलमध्ये जडेजाची वैयक्तिक कामगिरी देखील इतकी चांगली नव्हती. त्याने 10 सामन्यात फक्त 116चं धावा केल्या होत्या आणि 4 विकेट घेतल्या होत्या. या सर्व कारणांमुळे त्याच्यावर टीका होत होती. संघ व्यवस्थापनही त्याच्या कामगिरीवर नाराज होते. त्यामुळे त्याने आय़पीएल हंगामाच्या मध्येच कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता. आणि पुन्हा एकदा धोनीच्या खांद्यावर कर्णधार पदाची जबाबदारी आली होती.  

धोनी कर्णधारपदी आल्यानंतर जडेजा दुखापतीमुळे संघाबाहेर गेला होता. नंतर तो मैदानात परतलाच नाही.यावेळी असं म्हटलं जात होतं की चेन्नईच्या संघव्यस्थापनासोबत झालेल्या वादामुळे तो बाहेर पडला होता. मात्र संघव्यवस्थापन आणि जडेजा मधला वाद नेमका किती टोकाला पोहोचला होता याची कल्पना नव्हती. आता या दोघांच्या वादातील काही गोष्टी समोर येत आहेत.  

चेन्नईच्या सर्व आठवणी पुसल्या
 जडेजा आणि चेन्नईचा हा वाद निव्वळ आयपीएल 2022 हंगामा पुरता मर्यादित न राहता तो आणखीणच टोकाला गेलाय. कारण जडेजाने गेल्या 3 वर्षातील चेन्नई सुपर किंग्जशी संबंधित सर्व पोस्ट त्याच्या इंस्टाग्रामवरून हटवल्या आहेत. त्यामुळे हा वाद कितीला टोकाला गेलाया हे यावरून कळतय. 

तसेच वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी निवडलेल्या भारतीय संघाचा उपकर्णधार बनल्याबद्दल सीएसकेने अलीकडेच जडेजाचे त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर अभिनंदन केले. पण, जडेजाने त्यावर काहीही प्रतिक्रिया दिली नव्हती. संघव्यवस्थापनासोबत झालेल्या वादावरून तो अजून नाराज असल्याने त्याने यावर प्रतिक्रिया दिली नसावी. मात्र या वादामुळे जडेजा पुढच्या वर्षी कोणत्या संघाकडून आयपीएल खेळणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.