Team India : टीम इंडियाला मोठा धक्का! World Cup 2023 मधून भारताचा मोठा मॅच विनर बाहेर

World Cup 2023 :  ODI World Cup 2023 च्या आधी टीम इंडियासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. टीम इंडियाचा सामनावीर खेळाडू या स्पर्धेतून बाहेर राहणार आहे. 

Updated: Feb 19, 2023, 07:14 AM IST
Team India : टीम इंडियाला मोठा धक्का! World Cup 2023 मधून भारताचा मोठा मॅच विनर बाहेर  title=
Team India bad news India's big match winner out of World Cup 2023 shikhar dhawan confirms rishabh pant Will not play sports cricket news in marathi

ODI World Cup 2023 : Zee मिडीयाच्या स्टिंग ऑपरेशननंतर (#GameOver) टीम इंडिया एकापेक्षा एक झटके बसत आहे. त्यातच ODI World Cup 2023 च्या आधी टीम इंडियाला मोठा (Team India)  धक्का बसला आहे. भारतीय संघाचा एक धडाकेबाज फलंदाज या स्पर्धेतून बाहेर होऊ शकतो. टीम इंडियाने 2013 नंतर एकही आयसीसी ट्रॉफी जिंकलेली नाही, त्यामुळे भारतीय चाहत्यांना यावेळी संघाकडून मोठ्या आशा आहेत. पण या बातमीनंतर क्रिकेटप्रेमी नाराज झाले आहेत. 

टीम इंडियासाठी मोठी वाईट बातमी

भारताचा सलामीवीर शिखर धवनने (Shikhar Dhawan) त्या खेळाडूचं नाव सांगितलं आहे. शिखरने एका मुलाखतीत सांगितलं की, मी टीम इंडियाचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतशी (Rishabh Pant) बोललो आहे आणि तो 7-8 महिन्यांत बरा (Rishabh Pant Health) होईल. यावरुन असा अंदाज बांधला जातं आहे की, तो ODI World Cup 2023 ला मुकणार आहे. (Team India bad news India's big match winner out of World Cup 2023 shikhar dhawan confirms rishabh pant Will not play sports cricket news in marathi)

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

पंतचा जीव अपघातातून थोडक्यात बचावला

गेल्या वर्षी म्हणजे 30 डिसेंबर 2022 या दिवशी पहाटे 5.30 वाजता रुरकीच्या नरसन सीमेवर हम्मादपूरजवळ ऋषभ पंतच्या कारला अपघात झाला होता. या अपघातानंतर कारने पेट घेतला आणि या अपघातात पंत गंभीर जखमी झाला होता. या घटनेनंतर त्याला डेहराडूनमध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्याला मुंबईत हलविण्यात आलं होतं. पंतच्या गुडघा आणि घोट्याच्या लिगामेंटची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जवळपास एक महिन्यात त्याच्यावर आणखी एक शस्त्रक्रिया करावी लागेल. दुसरी शस्त्रक्रिया कधी होणार याबद्दल अजून ही स्पष्ट झालं नाही. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

पंतची 2022 मधील कामगिरी कशी होती? 

गेल्या वर्षी 2022 मध्ये ऋषभ पंतने टीम इंडियासाठी एकूण 7 सामने खेळले होते. या 7 सामन्यामध्ये 61.81 च्या सरासरीने 680 धावा पंतने केल्या. दुसरीकडे, पंतने गेल्या वर्षी भारतासाठी 12 एकदिवसीय सामन्यांमध्ये 37.33 च्या सरासरीने 336 धावा केल्या होत्या. T20 बद्दल बोलायचं झालं तर या फॉरमॅटमध्ये त्याने गेल्या वर्षी 25 सामने खेळताना 21.41 च्या सरासरीने केवळ 364 धावा केल्या होत्या.