Board of Control for Cricket in India: टी20 वर्ल्ड कप 2022 मध्ये भारतीय संघानं दणक्यात सुरुवात केली. पण, अंतिम सामन्यामध्ये जाणं काही संघाला जमलं नाही. ही नाचक्की पाहता बीसीसीआयनं लागलीच कठोर भूमिका घेण्यास सुरुवात केली. चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत असणाऱ्या निवड समितीला बरखास्त करत सर्वप्रथम BCCI नं आक्रमक भूमिका स्वीकारली. ज्यानंतर आणखी एक कठोर पाऊल उचलत बीसीसीआयनं संघातील एका दिग्गजालाच थेट बाहेरचा रस्ता दाखवला. (Team India BCCI paddy uptons Contract with indian cricket team read details latest news)
संघातून प्रशिक्षकालाच डच्चू
भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (BCCI) नं वर्ल्ड कपमध्ये मिळालेल्या पराभवानंतर मेंटल कंडिशनिंग कोच पॅची अप्टन (Paddy Upton) ला पदावरून हटवण्याचा निर्णय घेतला आहे. एका प्रतिष्ठीत वृत्तपत्राच्या माहितीनुसार यापुढे बीसीसीआय पॅडी यांच्यासोबतचं Contract renew करणार नाहीये. ज्यामुळं टी20 वर्ल्ड कपसोबतच भारतीय संघासोबतचा पॅडीचा प्रवासही संपला आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार 53 वर्षीय पॅडी अप्टनला (paddy uptons ) भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षपदी असणाऱ्या राहुल द्रविड (Rahul Dravid) याच्याच सांगण्यावरून संघात आणलं गेलं होतं. 2022 मध्ये त्यानं संघात एक सदस्य म्हणून प्रवेश केला. यापूर्वी 2008-11 दरम्यान संघासाठी मेंटल कंडिशनिंग आणि स्ट्रॅटर्जी कोच अशा दुहेरी भूमिका निभावत होता.
पॅडीनं आयपीएल (IPL) मध्ये राहुल द्रविड याच्यासोबत राजस्थानच्या संघासाठी काम केलं होतं. याशिवाय त्यानं पुणे, दिल्ली या संघांसाठीही प्रमुख प्रशिक्षक म्हणून काम केलं होतं. पाकिस्तान सुपर लीगमध्ये त्यानं लाहोर आणि बिग बॅश लीगमध्ये सिडनीच्या संघाचं प्रशिक्षकपद भूषवलं होतं. दक्षिण आफ्रिकेच्या संघासाठी त्यानं परफॉर्मन्स डायरेक्टर म्हणूनही काम पाहिसं आहे.