Ravi Shastri | टीम इंडियाचे हेड कोच रवी शास्त्री यांना कोरोनाची लागण, 4 जण आयसोलेशनमध्ये

टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Team India Head Coach Ravi Shastri) यांना कोरोनाची लागण झाली आहे.   

Updated: Sep 5, 2021, 04:12 PM IST
Ravi Shastri | टीम इंडियाचे हेड कोच रवी शास्त्री यांना कोरोनाची लागण, 4 जण आयसोलेशनमध्ये

लंडन : टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात चौथा कसोटी (India vs England 4th Test) सामना खेळवण्यात येत आहे. या कसोटीचा आजचा (5 सप्टेंबर) चौथा दिवस आहे. याआधी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Team India Head Coach Ravi Shastri) यांना कोरोनाची लागण झाली आहे. बीसीसीआयने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. शास्त्री यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर टीम इंडियाच्या सपोर्ट स्टाफमधील 4 जणांना आयसोलेशनमध्ये पाठवण्यात आले आहे. (team india head coach ravi shastri tested covid positive 4 support staff also isolated)   

4 जण आसलोटेड

रवी शास्त्री यांना कोरोना झाल्याने टीम इंडियाच्या सपोर्ट स्टाफमधील 4 जणांना खबरदारीचा उपाय म्हणून आयसोलेट करण्यात आले आहे. यामध्ये बॉलिंग कोंच भरत अरुण  (Bharat Arun), फिल्डिंग कोच आर श्रीधर (R Shridhar) आणि फिजीओथेरिपिस्ट नितीन पटेल यांना (Nitin Patel) आयसोलेटड केलंय. आयसोलेट करण्यात आलेल्या सर्वाची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे.  

ज्यांना कोरोनाची लक्षणं नसतात, त्यांची रॅपिड लेटरल फ्लो टेस्ट केली जाते. जर संबंधित व्यक्तीमध्ये कोरोनाची लक्षणं सापडली, तर त्यांची आरटपीसीआर टेस्ट केली जाते. बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार, "बीसीसीआयच्या मेडिकल टीमने शनिवारी रवी शास्त्री यांची लेटरल फ्लो टेस्ट केली. ही टेस्टचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. यानंतर कोणतीही जोखीम नको म्हणून सपोर्ट स्टाफमधील चौघांना आयसोलेट केलं गेलंय. या चौघांची आरटीपीसीआर टेस्ट केली गेली आहे. दरम्यान जेव्हापर्यंत चौघांचा रिपोर्ट येत नाही, तो पर्यंत यांना हॉटेलमध्ये ठेवण्यात येणार आहे".