टीम इंडिया T20 World Cup 2021 मधून बाहेर, विराटसेनेला या 5 चुका भोवल्या

न्यूझीलंडने अफगाणिस्तानला पराभूत केल्यानं टीम इंडियाचं (Indian Cricket team) टी 20 वर्ल्ड कपमधील ( t 20 world cup 2021) आव्हान संपुष्टात आलं.    

Updated: Nov 7, 2021, 10:57 PM IST
टीम इंडिया T20 World Cup 2021 मधून बाहेर, विराटसेनेला या 5 चुका भोवल्या  title=

मुंबई : टी 20 वर्ल्ड कप 2021 ची घोषणा झाल्यानंतर टीम इंडिया या स्पर्धेची प्रबळ दावेदार मानली जात होती. टीम इंडियाचे विराट कोहली, रोहित शर्म, रिषभ पंत, जसप्रीत बुमराहसारखे खेळाडू हे प्रतिस्पर्धी संघासाठी डोकेदुखी होते. मात्र टीम इंडियाने आयसीसीच्या स्पर्धेत निराशाजनक कामगिरी केल्याने आव्हान संपुष्टात आलं. न्यूझीलंडने अफगाणिस्तानला पराभूत केल्याने टीम इंडियाचं जर तरचं समीकरणही संपलं. न्यूझीलंडने या विजयासह सेमी फायनलमध्ये धडक मारली. तर 2007 मध्ये पहिला टी 20 वर्ल्ड कप जिंकणाऱ्या भारतीय संघाचा बाजार उठला. (team india makes this 5 big mistakes in icc t 20 world cup 2021) 

टीम इंडियाची या स्पर्धेतील सुरुवात निराशाजनक राहिली. पहिल्या सामन्यात पाकिस्तानने 10 विकेट्सने पराभूत केलं. तर त्यानंतर न्यूझीलंडने 8 विकेट्सने एकतर्फी विजय मिळवला. या दोन पराभवांमुळे टीम इंडियाला मोठा झटका लागला. या संपूर्ण स्पर्धेत टीम इंडियाकडून नेमकं कुठं चुकलं हे आपण जाणून घेऊयात.    

इंग्लंड टीम भारत दौऱ्यावर आली होती. त्यावेळेस टीम इंडियाचे खेळाडू धमाकेदार कामगिरी करत होते. मात्र आयपीएलच्या 14 व्या मोसमानंतर सर्व चित्र पालटलं. हार्दिक पंड्या दुखापतग्रस्त झाल्याने सर्व संतुलन बिघडलं. टीम मॅनेजमेंटने हार्दिकला संधी दिली. टीम इंडिया पाकिस्तान विरुद्ध 5 गोलंदाजांसह उतरली. मात्र पहिल्याच सामन्यात टीम इंडियाच्या गोलंदाजांना एकही विकेट घेता आली नाही. 

रोहित, विराट, केएलसारख्या आक्रमक फलंदाजांनी सराव सामन्यात धमाकेदार बॅटिंग केली. मात्र साखळी फेरीतील सामन्यात त्यांना तो सुरु गवसला नाही. पाकिस्तान आणि न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाचे टॉप ऑर्डरमधील खेळाडू अपयशी ठरले. न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात तर टीम इंडियाने ओपनिंग जोडी बदलली. ज्याचा मोठा फटका टीम इंडियाला बसला. 

गोलंदाजांची चुकीची निवड

टीम इंडियाच्या अपयशामागील सर्वात मोठं आणि तिसरं कारण म्हणजे गोलंदाजांची निवड. टीम इंडिया युजवेंद्र चहल आणि कुलदीप यादव यासारख्या अनुभवी फिरकी गोलंदाजांसह मैदानात उतरायची. मात्र या महत्त्वाच्या स्पर्धेत टीम मॅनेजमेंटने नवख्या फिरकी गोलंदांजावर विश्वास दाखवला आणि तिथेच सर्व फसलं.  

टॉस फॅक्टर 

टीम इंडियाच्या पराभवाचं आणखी एक कारण म्हणजे टॉस. दुबईत होणाऱ्या दिवस रात्र सामन्यात पहिले बॅटिंग करणाऱ्या संघाला धावा करण्यास अडचणी आल्या आहेत. टीम इंडिया या स्पर्धेतील पहिल्या दोन आणि महत्त्वाच्या सामन्यात टॉस हरली. रात्री मैदानात दव पडतो. या ड्यु फॅक्टरमुळे पाकिस्तानने सहजपणे 152 धावांचा आव्हान पूर्ण केलं. तर न्यूझीलंडनेही 111 धावा आरामात पूर्ण केल्या.   

बायो बबलमधील थकावटही प्रमुख कारणांपैकी एक कारण आहे. टीम इंडिया इंग्लंड विरुद्ध कसोटी मालिका खेळल्यानंतर आयपीएलचा 14 वा मोसम खेळण्यासाठी यूएईला रवाना झाली. आयपीएलनंतर टी 20 वर्ल्ड कप स्पर्धा खेळायची होती. त्यामुळे सातत्याने क्रिकेट खेळल्याने टीम इंडियाच्या खेळाडूंना विश्रांतीसाठी हवा पुरेसा वेळ मिळाला नाही.