Rohit Sharma | रोहित शर्माच्या या 2 खास मित्रांचं टी 20 वर्ल्ड कपमध्ये स्थान निश्चित?

टीम इंडियाचं (Team India) 2021 मध्ये वर्ल्ड कप जिंकण्याचं स्वप्न अधुरं राहिलं.आता टीम इंडियाने रोहित शर्माच्या नेतृत्वात आगामी टी 20 वर्ल्ड कपच्या 2022 (Icc T20I World Cup 2022) दृष्टीने संघाची मोट बांधण्याची तयारी केली आहे. 

Updated: Mar 1, 2022, 08:03 PM IST
 Rohit Sharma | रोहित शर्माच्या या 2 खास मित्रांचं टी 20 वर्ल्ड कपमध्ये स्थान निश्चित? title=
प्रातिनिधिक छायाचित्र

मुंबई :  टीम इंडियाचं (Team India) 2021 मध्ये वर्ल्ड कप जिंकण्याचं स्वप्न अधुरं राहिलं.आता टीम इंडियाने रोहित शर्माच्या नेतृत्वात आगामी टी 20 वर्ल्ड कपच्या 2022 (Icc T20I World Cup 2022) दृष्टीने संघाची मोट बांधण्याची तयारी केली आहे. त्यानुसार कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma) अनेक प्रयोग करतोय. रोहित करत असलेले प्रयोग यशस्वीही होत आहेत. रोहितच्या नेतृत्वात अनेक युवा खेळाडू शानदार कामगिरी करत आहेत. अशात या टी 20 वर्ल्ड कपसाठी रोहितच्या 2 लाडक्या मित्रांचं संघातील स्थान निश्चित मानलं जात आहे. (team india mumbaikar player shreyas iyer and suryakumar yadav fantastic playing in last some months in various series) 

कोण आहेत ते दोघे?  

हे दोन्ही खेळाडू मुंबईकर आहेत. श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) आणि सू्र्यकुमार यादव (Suryakumar Yadav) या दोघांचं आगामी वर्ल्ड कपसाठी निवड निश्चित मानलं जात आहे. दोघांनी गेल्या काही महिन्यांमध्ये धमाकेदार कामगिरी केली आहे. 

श्रेयस अय्यर

श्रीलंका विरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली. त्यामुळे विराटच्या तिसऱ्य स्थानी रोहितने श्रेयसला खेळवण्याची संधी दिली. श्रेयसने संधीचं सोनं केलं. 

श्रेयसने या 3 सामन्यात सलग 3 अर्धशतकं लगावली. श्रेयस भारतात सलग 3 अर्धशतकं लगावणारा पहिला भारतीय ठरला. तसेच श्रेयसने विराटचा 3 सामन्यांच्या मालिकेत सर्वाधिक धावा करण्याचा रेकॉर्ड ब्रेक केला.

श्रेयसच्या या सातत्यपूर्ण आणि आक्रमक खेळीमुळे त्याला वर्ल्ड कप टीममध्ये नक्की स्थान मिळेल, असं म्हटलं जात आहे.

सूर्यकुमार यादव 

युवराज सिंह, सुरेश रैना या सारख्या मिडल ऑर्डरमधील फलंदाजांनी निवृत्ती घेतली. त्यानंतर टीम इंडियाला मधल्या फळीत असे आक्रमक फलंदाज मिळाले नाहीत. मात्र आता टीमकडे असाच वादळी खेळी करणारा आक्रमक बॅट्समन मिळाला आहे. 

सूर्यकुमारने गेल्या काही मालिकांमध्ये दमदार कामगिरी केली आहे. त्याने आपल्या कामगिरीने निवड समितीला खूश केलं आहे. सूर्याने टीम इंडियाला आतापर्यंत मोजके सामने एकहाती जिंकून दिले आहेत. 

सूर्यामध्ये सामना एकहाती पलटवण्याची क्षमता आहे. मैदानात एकबाजू लावून धरण्याची ताकद सूर्यामध्ये आहे. त्यामुळे वर्ल्ड कपसाठी या दोघांना स्थान मिळण्याची शक्यता आहे.