टी-20 नंतर वनडे सिरीज जिंकण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया

भारतीय टीम मागच्या सामन्यातील चुका सुधारणार

Updated: Jul 17, 2018, 09:54 AM IST
टी-20 नंतर वनडे सिरीज जिंकण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया title=

मुंबई : दुसऱ्या सामन्यात पराभवानंतर भारतीय संघाला त्यांच्या चुका लक्षात आल्या असतील. त्यामुळे तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात भारतीय संघ पुन्हा ती चूक होऊ नये म्हणून तयारी करुन मैदानात उतरेल. विराट कोहली लागोपाठ 10 वी सिरीज जिंकण्याचा प्रयत्न करतील. नॉटिघंममध्ये पहिल्या सामन्यात आठ विकेटने विजय मिळवल्यानंतर लॉर्ड्समध्ये भारतीय संघाला 86 रनने पराभव झेलावा लागला होता. ज्यामुळे सिरीज 1-1 ने बरोबरीत आली आहे. 

वन-डे रँकिंगमध्ये नंबर 1

लंडनमधील विजयानंतर इंग्लंडचं आयसीसी रँकिंगमध्ये पहिलं स्थान पक्क झालं होतं. आज जर भारताचा विजय झाला तर पहिल्या स्थानासाठीचं अंतर कमी होईल. सध्या इंग्लंड 126 पॉईंटसह पहिल्या तर भारत 122 पॉईंटसह दुसऱ्या स्थानावर आहे. आजच्या विजयानंतर भारतीय संघाचा आत्मविश्वास देखील वाढेल. ज्याचा फायदा आगामी सामन्यांमध्ये भारताला होईल. 

भारतीय टीम वन-डे क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करत आहे. जानेवारी 2016 मध्ये संघाला ऑस्ट्रेलियामध्ये 1-4 ने पराभवाचा धक्का बसला होता. पण त्यानंतर भारताने चांगली कामगिरी केली आहे. जिम्बाब्वे, न्यूझीलंड, इंग्लंड, वेस्टइंडिज, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेला भारताने पराभूत केलं आहे. 

7 वर्षापूर्वी 0-3 ने पराभवानंतर भारताने आपला दबदबा वाढवला. टीम इंडियासाठी इंग्लंडवर विजय मिळवण्याची आणखी एक संधी आहे. भारताने मागील 17 सामन्यांपैकी 10 सामने जिंकले आहेत.

ओपनिंग: ओपनिंगची जबाबदारी रोहित शर्मा आणि शिखर धवन यांच्यावर असणार आहे. दोन्ही खेळाडूंनी आतापर्यंत टीमला चांगली सुरुवात करुन दिली आहे. पण धवन मोठी इनिंग खेळण्यात अपयशी ठरत आहे. रोहितने पहिल्या सामन्यात शतक ठोकलं असलं तरी त्याला या अंतिम सामन्यात मोठी इनिंग खेळण्याची गरज आहे. 

मिडल ऑर्डर: मिडल ऑर्डरमध्ये टीममध्ये एक बदल होऊ शकतो. के एल राहुलच्या जारी दिनेश कार्तिकला संधी दिली जाऊ शकते. तीसऱ्या नंबरवर विराट कोहली, चौथ्या नंबरवर सुरेश रैना, पाचव्या नंबरवर दिनेश कार्तिक, सहाव्या नंवबरवर धोनी, सातव्या नंबरवर हार्दिक पंड्या खेळण्यासाठी येऊ शकतो.

बॉलिंग : टीममध्ये आणखी 1 बदल बॉलरच्या बाबतीत होऊ शकतो. भुवनेश्वर कुमारला पुन्हा संधी मिळू शकते. कुलदीप यादव, उमेश यादव आणि युजवेंद्र चहल हे देखील संघात राहतील. स्पिनर्सवर या सामन्यात मोठी जबाबदारी असणार आहे.

भारतीय टीम (शक्यता): रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली, सुरेश रैना, दिनेश कार्तिक, एम एस धोनी, हार्दिक पंड्या, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल, उमेश यादव.