मुंबई : टीम इंडियातला प्रतिभावंत खेळाडू संजू सॅमसनच्या निवृत्तीची चर्चा क्रिकेट वर्तुळात रंगलीय. त्यामुळे संजू चाहते सध्या शॉकमध्ये आहेत. प्रत्येक सामन्यात धावांचा पाऊस पाडून सुद्धा संजू सॅमसनच्या निवृत्त व्हाव अशी चर्चा का रंगलीय, असा सवाल आता उपस्थित होऊ लागलाय.
आयपीएल 2022 च्या हंगामापासून संजू सॅमसन फॉर्ममध्ये आहे. आयपीएलमध्ये त्याने 17 सामन्यात 458 धावा ठोकल्या होत्या. फॉर्ममध्ये असून सुद्धा संजू सॅमसनची इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय आणि T20I मालिकेसाठी निवड झाली नव्हती. इंग्लंड दौऱ्यावर बीसीसीआयने संजू सॅमसनकडे दुर्लक्ष केले. पहिल्या T20 सामन्यासाठीच त्याची संघात निवड झाली होती, ज्यामध्ये विराट कोहली आणि ऋषभ पंत यांना विश्रांती देण्यात आली होती.
तसेच आयर्लंड विरूद्ध दोन टी20 सामन्यात देखील पहिल्या सामन्यात त्याला संधी देण्यात आली होती. दुसऱ्या सामन्यात संधी मिळताच संजूने 77 धावा ठोकत आपली प्रतिभा दाखवून दिली होती. या सामन्यात त्याच्या चांगल्या फलंदाजीने टीम इंडियाने धावांचा मोठा डोंगर उभारला होता.
दरम्यान आता टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात एक टेस्ट सामना, तीन टी20 आणि तीन वनडे सामने खेळवले जाणार आहेत.मात्र या दौऱ्यातही बीसीसीआयने फलंदाज संजू सॅमसनकडे दुर्लक्ष केले.याच कारणामुळे संजूचे चाहते नाराज दिसत आहेत.
चाहते संतापले
बीसीसीआय सतत संजू सॅमसनला सामन्यातूव डावलंत असल्याने चाहते संतापले आहेत. एका यूजरने कमेंट करत म्हटले की, 'संजू सॅमसनचे खूप चाहते आहेत यात शंकाच नाही. केवळ एकच संधी मिळाली त्यात ७७ धावा केल्या. तरीही ४८ सामन्यांत फ्लॉप रिषभ पंतला त्याच्याआधी संधी मिळत आहे. संजूने केवळ एक वनडे खेळला, ज्यामध्ये त्याने 46 धावा केल्या. त्याला दुसरा वनडे खेळण्याची संधीही मिळाली नाही,असे त्याने म्हटलेय.
सतत सामन्यात संधी मिळत नसल्याने एका दुसऱ्या युझरने संजूला निवृत्तीचा सल्लाही दिला आहे. युझरने लिहिले की, 'संजू सॅमसनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घ्यावी. आणि त्याने इंग्लंड किंवा ऑस्ट्रेलियाकडून खेळावे.